हजारोंच्या संखेने उपस्थित राहण्याचे भंते शाक्यपुत्र राहुल यांचे आवाहन
शेवगाव प्रतिनिधी, दि.२१ : संभाजी नगर जिल्हयाच्या सरहद्दीवर असणाऱ्या तेलवाडी येथील जेतवन धम्म संस्कार केंद्रात गुरुवारी
२३ मे रोजी बौद्ध पोर्णीमेला राज्यस्तरीय धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी सर्वधर्मीय समाज बांधवानी उपस्थित राहुन तथागत भगवान गौतम बुद्ध व त्यांचे तत्वज्ञान समजुन घेवुन आपले जिवन सुखकर करावे असे आवाहन या संस्कार केंद्राचे अध्यक्ष भंते शाक्य पुत्र राहुल, उपाध्यक्ष डॉ. पंडीत किल्लारीकर, सचिव अरुण बल्लाळ यांनी केले आहे.
दि. १३ मे पासून श्रामणेर शिबीरास प्रारंभ झाला असुन ११० उपासक चिवर धारण करून शिबीरात बौद्धाचार्याचे प्रशिक्षण घेत आहेत. एवढया मोठ्या संख्येने श्रामणेर प्रशिक्षणार्थी शिबीर बहुदा राज्यातले हे पहिलेच श्रामणेर शिबीर असण्याची शक्यता आहे. २३ मे ला श्रामणेर शिबीराची सांगता तसेच धम्म मेळावा असा कार्यक्रम होणार आहे. या मेळाव्यास राज्यभरातील आदरणीय भिक्कुगण उपस्थित राहुन मार्गदर्शन करणार आहेत.
धम्म मेळावा यशश्वी करण्यासाठी दहा दिवसापासुन भंते भारद्वाज, भंते आनंद, भंते सचितबोधी यांचे मार्गदर्शनाखाली बौध्द उपासक दिलीप पाईक, अशोक पगारे, सुरेश घोक्षे, स्वप्निल साळवे, एस. डी. जाधव, दिलीप घोक्षे, सतीशराव बोर्डे, सुनील ब्रह्मराक्षस, रवींद्र मोरे, मुरलीधर दाभाडे, प्रा.एस.डी ब्रह्मराक्षस, तातेराव वाघवस, सुंदरराव दादा, निसर्गन दादा, अशोकराव गायकवाड, मेजर प्रवीण डोंगरे, कैलास बोर्डे, दिलीप दाभाडे, सोमनाथ निकाळजे, पंडीत गंगाधर परिश्रम घेत आहेत.