वडिलांच्या पुण्यस्मरणा निमित्त मुलाने पोलीसांना दिले जिव वाचवण्याचे प्रशिक्षण

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : तालुक्यातील बोधेगांव येथील डॉ. अरुण गोरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित त्यांच्या  मुलाने डॉ. किरण यांनी आणीबाणीच्या प्रसंगी अपघात झाल्यावर किंवा तत्सम प्रसंगी रुग्णांचे प्राण कसे वाचवायचे, किमान तो रुग्णालया पर्यंत जिवंत कसा जाईल यासाठी काय काळजी घ्यायची याचे प्रशिक्षण शेवगावच्या पोलीसांना देवून वडिलांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी  शेवगाव पोलीस ठाण्यातच सर्व पोलीस कर्मचाऱ्यासाठी  प्रथमोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. वडिलांच्या नावाने सुरु केलेल्या ‘अरुणोदय प्रतिष्ठान’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला. त्यात हार्ट अटॅक, पॉईसनिंग,शॉक, रस्ता अपघात, सीपीआर,ट्रौमा अशा वेगवेगळ्या अपघात प्रसंगी घ्यावायची काळजी या बद्दल सर्व माहिती प्रात्यक्षिकासह देण्यात आली.  डॉ. किरण गोरे यांच्य स्तुत् उपक्रम बद्दल त्यांचे कौतूक होत आहे.