शेवगाव खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी बाळासाहेब विघ्ने व उपसभापतीपदी बाबासाहेब दिवटे

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ : शेवगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या सभापतीपदी मंगरूळ येथील बाळासाहेब नागू विघ्ने यांची तर उपसभापतीपदी चापडगावचे बाबासाहेब रामभाऊ दिवटे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

Mypage

संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक पदाधिकारी निवडीसाठी सोमवारी (दि.१२ ) सहाय्यक निबंधक विजयसिंह लकवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत विघ्ने यांचा सभापती पदासाठी तर उपसभापतीपदासाठी दिवटे यांचा असे फक्त दोघांचे उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने या निवडी बिनविरोध करण्यात येत असल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी लकवाल यांनी जाहीर केले.      

tml> Mypage

माजी आमदार डॉ नरेंद्र पाटील, चंद्रशेखर घुले, पंचायत समितीचे माजी सभापती डॉ क्षितिज घुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली होती. त्यानंतर सोमवारी नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

Mypage

यावेळी काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादी युवक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कैलास नेमाने, बाजार समितीचे सभापती एकनाथ कसाळ, संचालक हनुमान पातकळ, भास्कर खेडकर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुका खरेदी विक्री संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

Mypage

संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विकासासाठी तसेच कल्याणासाठी विविध उपाय योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांच्या सहकार्याने नूतन पदाधिकारी काम करतील व तालुक्यासह जिल्ह्यात खरेदी विक्री संघ अग्रेसर राहील यासाठी नूतन पदाधिकारी प्रयत्नशील राहतील असा विश्वास बाजार समितीचे सभापती कसाळ यांनी यावेळी व्यक्त केला.

Mypage

नानासाहेब मडके, बाळासाहेब ढाकणे, चंद्रकांत निकम, भारत मोरे, प्रल्हाद देशमुख यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रभारी व्यवस्थापक दत्ता मुटकुळे यांनी आभार मानले. 

Mypage