मिनी गोल्फ स्पर्धेत काकडे विद्यालयाचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि१२ : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत नागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी व नागपूर मिनी गोल्फ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ स्पर्धेत येथील आबासाहेब काकडे विद्यालयाच्या ३३ मुला-मुलीनी सहभाग घेऊन संघाने सुवर्ण पदकासह अनेक पदकांची लयलुट केली.

यामध्ये सिंगल, डबल, मिक्स डबल, अशा प्रकारात १७ वर्षाखालील गटात रुद्र व्यवहारे, कृष्णा सातपुते यांनी डबल या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक,  १९वर्षाखालील गटात समृद्धी आहेर हिने सिंगल क्रीडा प्रकारात कांस्य पदक, १४ वर्षाखालील गटात ध्रुविका बडे व अंजली खवले यांनी डबल या क्रीडा प्रकारात कांस्य पदक, १७ वर्षाखालील गटात सागर पवार व शर्वरी पुरनाळे यांना मिक्स डबल क्रीडा प्रकारात रोप्य पदक,

१४ वर्षा खालील गटात साक्षी लहाने हिने सिंगल क्रीडा या प्रकारात रोप्य पदक, तसेच मंजरी साबळे, साक्षी शिनगारे डबल या क्रीडा या प्रकारात रोप्य पदक, १७ वर्षाखालील गटात विपुल गोरे, सुयेश लहाने डबल इव्हेंट या प्रकारात रोप्य पदक तर ओव्हर ऑल चॅम्पियनशिप मध्ये १४ वर्षाखालील मुलींच्या गटाने तृतीय क्रमांक संपादन केला.

या सर्व खेळाडूना क्रीडा शिक्षक कल्पेश भागवत, विक्रम घुटे, संतोष ढोले, वैशाली धोंडे यांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.ॲड. शिवाजी काकडे, माजी जि.प.सदस्या हर्षदा काकडे, प्रा. लक्ष्मण बिटाळ, विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे, प्राचार्य संपत दसपुते यांनी अभिनंदन केले आहे.