सोमय्या महाविद्यालयात राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय येथे कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशन व महाविद्यालयाच्या वतीने कोपरगाव तालुक्याचे माजी आमदार कै. के.बी. रोहमारे (दादा) यांच्या स्मरणार्थ दि.17 व 18 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजिव कुलकर्णी, गोदावरी बायोरिफायनरीज लि.चे संचालक मा.सुहास गोडगे, मा. बाळासाहेब पालवे, कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष मा. संदिपराव रोहमारे, सचिव मा.सत्येन मुंदडा, मा. सुनिल बोरा, मा. सागर रोडे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध खेळाडू, संघनायक, मार्गदर्शक व क्रिडा रसिक उपस्थित होते. दोन दिवस खेळल्या गेलेल्या या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत राज्यभरातून अनेक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला. ही स्पर्धा महिला(डबल), पुरुष ओपन(डबल), मिक्स डबल, 35 वयोगटावरील पुरुष (डबल) असे चार गट तयार करण्यात आले होते. यामध्ये महिला गटात प्रथम पारितोषिक ऋता गोरे व फाल्गुनी निकुंभ, द्वितीय पारितोषिक रूपाली टेके व प्रांजल अंधारे तर तृतीय पारितोषिक हर्षदा कट्यार व वेदश्री बंडेवार यांनी पटकावले.

मिक्स डबल गटात प्रथम पारितोषिक मॉन्टी तिवाडी व वेदश्री बंडेवार, द्वितीय पारितोषिक दीप रांभिया व नमिता शेट्टी, तर तृतीय पारितोषिक गणेश सपकाळ व फाल्गुनी निकुंभ यांनी पटकावले. पुरुष ओपन दुहेरी स्पर्धेत प्रथम पारितोषिक दीप रांभिया व शुभम पाटील, द्वितीय पारितोषिक वसीम खान व सलमान अन्सारी तर तृतीय पारितोषिक तेजस खोमणे व गणेश सपकाळ यांनी पटकावले. 35 वयोगटावरील पुरुष दुहेरी सामन्यात प्रथम पारितोषिक डॉ. प्रीतम जपे व चंदन जाधव , द्वितीय पारितोषिक डॉ.डुंगरवाल व शेखर दायमा तर तृतीय पारितोषिक राकेश पेठारे व वैभव अंबी यांनी पटकावले.

या स्पर्धेसाठी महिला डबल गटात प्रथम बक्षीस अनुक्रमे रु. 7000, 5000, 2000 तर मिक्स डबल प्रथम बक्षीस अनुक्रमे रु.7000, 5000, 2000 असे ठेवण्यात आले होते. पुरुष ओपन (डबल) गटात प्रथम बक्षीस क्रमशा रु. 21000,11000, 5000 तर 35 वयोगटातील पुरुष (डबल) प्रथम बक्षीस रु.15000 द्वितीय 7000 तृतीय 3000 असे ठेवण्यात आलेले होते. पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव तालुक्‍याचे आमदार मा. आशुतोषदादा काळे हे उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक प्राप्त सर्व विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या दोनदिवसीय राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोपरगाव तालुका बॅडमिंटन असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुनील कुटे, क्रिडा शिक्षक मिलिंद कांबळे, रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.जी.एन.डोंगरे, प्रा.सुजित पानगव्हाणे, किशोर गायकवाड यांनी केले.