चापडगावला जुगार अड्ड्यावर छापा

चार लाख ६६  हजाराच्या मुद्देमालासह नऊ आरोपी ताब्यात

शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : शेवगाव  विभागाचे उपाधीक्षक संदीप मिटके यांचे पथकाने आज तालुक्यातील चापडगाव शिवारात टाकलेल्या जुगार अडयावरील छाप्यात ९ जणांना रंगेहात पकडून त्यांचेकडून४ लाख६६ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

     या संदर्भात अधिक माहिती अशी की, उपाधीक्षक मिटके यांना   गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या बातमीनुसार चापडगाव येथील गदेवाडी कडे जाणारे रोडवरील शेतातील शेडच्या आडोशाला  काही इसम तिरट नावाचा जुगार खेळत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने  त्यांनी पोलिस अंमलदारांना कारवाई करण्याचे आदेश दिल्याने तेथे जाऊन छापा टाकला असता.

आरोपी  कुंदन संभाजी मडके (वय 30 वर्ष रा सोनई सांगवी ता शेवगाव ), बाबासाहेब एकनाथ म्हस्के (रा. आखातवाडा ता. पैठण जि.औरंगाबाद ), भगवान अर्जुन झिरपे (वय 47 वर्षे रा. कोळगाव ता.शेवगाव ), रामकिसन नारायण कोलाळे ( वय 50 वर्ष रा. गदेवाडी ता.  शेवगाव ), भगवान बापूराव झिरपे ( वय 47 रा.  कोळगाव ता. शेवगाव ), भगवान विष्णू ढाकणे( वय 43  वर्ष रा. हसनापूर तालुका शेवगाव ), बाप्पासाहेब त्र्यंबक विघ्ने वय 40 वर्ष रा. कोर्टाच्या मागे तालुका शेवगाव ),
काकासाहेब भाऊसाहेब घोरतळे (रा बोधेगाव ता शेवगाव ) व विनोद दत्तात्रेय नेमाने (वय 30 वर्ष रा. चापडगाव ता शेवगाव )यांचे ताब्यातून  4,66,280/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून सर्व आरोपी विरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात पो.कॉ.नितीन चव्हाण यांचे फिर्यादी वरून मुंबई जुगार कायदा कलम 12( अ)  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपअधिक्षक
संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली पो.स.ई दादाभाई मगरे, स.फौ.राजेंद्र आरोळे, पो.हे.कॉ सुरेश औटी, पो.कॉ. नितीन चव्हाण, पो. कॉ.नितीन  शिरसाठ  यांनी केली.