काळोखे आरएमसीमध्ये संजीवनीच्या १७ अभियंत्यांची निवड

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : संजीवनी के.बी.पी.पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांना एकापाठोपाठ एक नामांकित कंपनी नोकऱ्या देत असुन अलिकडेच काळोखे आरएमसी कंपनीने सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या १७ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. अशा  प्रकारे ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाला लागोपाठ यश  प्राप्त होत असुन पालक व विद्यार्थी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे, अशी  माहिती संजीवनी  पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

 काळोखे आरएमसी या रेडिमिक्स्ड कॉन्क्रिट उत्पादक कंपनीने सार्थक नितिन वराळे, सचिन दिपक कुऱ्हे , गुलशन खातुन, संकेत भरत वाघ, संकेत अशोक  कदम, सचिन परदेशी , जयलाल कुमार, अभिजीत रविंद्र आघाडे, सिध्दार्थ किरण उगले, रोहन संतोष  गडाख, गोकुळ बाळासाहेब पगार, चुन्नु कुमार, अमित कुमार, सुमित कुमार, विवेक कुमार यादव, सोनु कमार यादव व निरज कुमार सिंघ यांची निवड केली आहे.

        संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे,  त्यांच्या पालकांचे तसेच प्राचार्य ए. आर. मिरीकर यांचे  अभिनंदन केले. मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी डीन अकॅडमिक डॉ. के.पी. जाधव, टी अँड  पी प्रमुख  प्रा. आय.के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार, प्रा. एम. आर. गुंजाळ, आदी उपस्थित होते.