कोपरगाव प्रतिनिधी, दि. १३ : नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात मी उतरल्या बरोबर शासकीय यंञणानी तत्परता दाखवून आमच्या संस्थांवर धाडसञ सुरू केले त्यात त्यांना काहीच सापडले नाही. माञ शिक्षकांचे प्रतिनिधी असलेल्या आमदार किशोर दराडे यांच्यावर खुनासह फसवणुकीचे गंभीर गुन्हे असताना शासकीय यंञणा त्यांची चौकशी तितक्याच तत्परतेने करणार का? किशोर दराडे यांच्या दडपशाहीला सुज्ञ शिक्षक मतदार मतदानातून उत्तर देतील असे मत अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक व कोल्हे साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांनी पञकार परिषदेत व्यक्त केले.
गुरुवारी सकाळी कोल्हे साखर कारखान्याच्या विश्रामगृहवर नाशिक शिक्षक मतदार संघातून निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी पञकार परिषद घेवून कोल्हे यांच्या विविध संस्थांवर धाड सञ सुरु असलेल्या बाबतीत खुलासा करताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी ते पुढे म्हणाले की,
डॉ. राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज माघार घेवून मला आशीर्वाद दिला आहे. डाॅ. राजेंद्र विखे हे मुळातच स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. कोल्हे परिवाराशी त्यांचे नाते जिव्हाळ्याचे असुन ते माझ्यासाठी पितृतुल्य असल्याने मला ते सहकार्य करतील.
मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या संबधीत खात्याने आमच्या संस्थांवर धाडी टाकल्या. मात्र पारदर्शक कारभारामुळे कुठेही त्रुटी आढळून आल्या नाहीत. ज्या तत्परतेने आमच्यावर धाडसत्र चालवले त्याच तत्परतेने आमदार किशोर दराडे यांच्यावर दाखल असलेल्या विविध गुन्ह्याची चौकशी होऊन छडा लावावा. केवळ मी शिक्षक मतदार संघातून उमेदवारी करतोय या आकसापोटी कारवाई करणे योग्य नाही. मी शिक्षक संघटना व शिक्षकांच्या आग्रहास्तव निवडणुक लढवत आहे. अपक्ष लढावे अशी सर्वांची भावना होती. मला सर्व जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
गुन्हेगारी प्रवृत्तीचे किशोर दराडे म्हणजे शिक्षक संघाला लागलेला कलंक आहे तो पुसण्यासाठी मला या निवडणुकीत उभं राहावं लागलं अशी खंत कोल्हे यांनी व्यक्त केली ते पुढे म्हणाले, शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठीना फसवणारे आमदार दराडे शिक्षकांना देखील फसवतील. ज्या तत्परतेने आमच्यावर धाडी टाकल्या तीच तत्परता दराडेबाबत दाखवावी. स्नेहल गाडेकर (निफाड)ह्या दराडे यांच्या संस्थेत नोकारीला नसतानाही बनावट हजेरी, पगारपत्रकाचा दस्तऐवज करून दराडेंनी स्वतः आर्थिक फायदा करून घेतला. भीमराव पगारे केसचा उल्लेख प्रतिज्ञापत्रकात दराडे यांनी केलेला नाही यासह आमदारांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत त्यांची सखोल चौकशी तातडीने करावी.
शौर्य पुरस्कार विजेते अशोक मोहारे यांनी खून प्रकरणी केलेल्या आरोपांची देखील चौकशी करावी. सन २००१ मध्ये संतोष साखर कारखाना लि. या नावाने दोन कोटी रुपयेचे शेअर्स नागरीकांकडून गोळा केले, मात्र किशोर दराडेंनी अद्याप हि कारखाना उभा केला नाही. ज्या लोकांकडून दोन कोटी गोळा केले त्यांना व्याजासह पैसे परत करावे व दराडे यांची चौकशी करावी अशी मागणी शासनाकडे कोल्हे यांनी यावेळी केली. कोल्हे यांनी यावेळी शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे यांच्या काळ्या कारनाम्याची यादी माध्यमांच्या समोर सादर करून दराडे यांच्या दादागिरीचा आलेख दाखवला.
सहकाराची पंढरी असलेल्या कोपरगाव तालुक्यात स्व. शंकरराव कोल्हे यांनी गेल्या ६० वर्षांपासून पारदर्शक कारभार करून सहकार रूजवला व वाढवला. या ठिकाणी या पुर्वी कधीच अशा धाडी टाकल्या नाही, माञ आकसापोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताब्यातील खात्यामार्फत धाडी टाकुन दबावतंत्राचा वापर करण्यात आला याची खंत वाटते. धाड टाकणे, चौकशी करणे स्वाभाविक आहे पण आकसापोटी टाकणे योग्य नाहीअशी खंत विवेक कोल्हे यांनी केली.