शेवगावात नीट, नेट परीक्षा घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांना अटकेची मागणी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २२ : नीट व युजीसी नेट परीक्षांच्या घोटाळ्या विरोधात येथील ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी नीट रद्द करा, नेट परीक्षा घोटाळा प्रकरणी भ्रष्टाचाऱ्यांना अटक करून सखोल चौकशी करा, शिक्षणातील भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, शिक्षणाचे खाजगीकरण रद्द करा, सर्व प्रकारच्या परिक्षा शासकीय यंत्रणा मार्फतच घेण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.

   फेडरेशनचे राज्य निमंत्रक कॉ. संजय नांगरे, संदिप इथापे यांच्या सह प्रज्ञा उगले, अभी बोरुडे, अक्षय साखरे, यश बोरुडे, अजिंक्य लहासे, सूरज नागरे, राजेंद्र वाघमारे, रुद्र पवार, विश्वकर्मा अमरनाथ, बुचडे सार्थक, अमोल तुजारे, आदित्य लांडे, अफरोज शेख, ज्ञानेश्वर राशिनकर, सायली राहुल वरे, राज वरे, ओम साखरे, आदित्य भुजबळ आदि पदाधिकारी व कार्यकर्त्यानी सहभाग घेतला होता.