शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : सध्या सर्वत्र वातावरण बदलत आहे, उष्णतेचे प्रमाण प्रचंड वाढत आहे तर पावसाचे प्रमाण घटत आहे. हा पर्यावरणाचा ऱ्हास , सर्वत्र झालेल्या अमर्याद वृक्ष तोडीचा परिपाक आहे. भविष्य काळ अधिक भयानक असून तुम्हा आम्हाला जगणे अशक्य होणार आहे. हा ऱ्हास रोखण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. त्यासाठी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे देखील तितकेच गरजेचे असून प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संवर्धन करावे असे प्रतिपादन शेवगाव न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायाधीश संजना जागुष्टे यांनी येथे केले.
येथील शेवगाव न्यायालयाच्या आवारात न्यायाधीश जागुष्टे, न्यायाधीश व्ही. बी. डोंबे यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामदास बुधवंत, माजी अध्यक्ष ॲड. कारभारी गलांडे, ॲड. लक्ष्मणराव लांडे पाटील, ॲड. शिवाजीराव भोसले, ॲड. आदिनाथ शिंदे, ॲड. आकाश लव्हाट, ॲड. जयप्रकाश देशमुख, ॲड. बीबी चेमटे, ॲड.संभाजी देशमुख, ॲड. व्ही ए. भेरे, ॲड. सुहास चव्हाण, ॲड. रवींद्र सकट, ॲड. भारस्कर, ॲड. किरण तहकीक, ॲड. बी बी माळवदे आदींची उपस्थित होते.