कोपरगाव प्रतिनिधी, दि.२६: मागील काही दिवसांपासून कोल्हे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात काळे गटात प्रवेश करीत असून बुधवार (दि.२६) रोजी पुन्हा कोल्हे गटाच्या तीन प्रमुख कार्यकर्त्यांनी काळे गटात प्रवेश केला आहे.
कोपरगाव शहरात कोल्हे गटाला मोठे खिंडार पडले असून माजी उपनगराध्यक्षासह अनेक माजी नगरसेवक व अनेक कार्यकर्ते आ. आशुतोष काळे यांनी केलेल्या विकास कामांवर प्रभावित होवून काळे गटात प्रवेश करीत आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात कोल्हे गट खिळखिळा झाला असतांना पुन्हा तीन कार्यकर्त्यांनी काळे गटाची वाट धरली आहे.
यामध्ये महेश गोसावी, गणेश गोसावी व विजय गोयल या कोल्हे गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्याचे आ. आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवार (दि.२६) रोजी नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुक पार पडत असतांना या निवडणुकीत कोल्हे उमेदवार आहेत. मात्र याच दिवशी त्यांच्या जवळच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी कोल्हे गटातून काळे गटात प्रवेश केल्यामुळे हा कोल्हे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.