कोल्हेंचा छावा पराभव होवूनही त्याचीच हवा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : नाशिक शिक्षक मतदार संघाची निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच चुरशीची लढत झाली त्यातही विजयी उमेदवारापेक्षा पराभव झालेल्या विवेक कोल्हेंची चर्चा राज्यात सुरु झाली. 

 माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा वारसा घेवून राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले विवेक कोल्हे यांनी अवघ्या एक महीन्यात थेट पाच जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांपर्यंत पोहचले राज्यातील कोणताही बडा नेता बडा सोबत नाही, खासदार, आमदार नाही, पक्ष नाही, पार्टी नाही केवळ स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांच्या शिदोरीवर शिक्षकांच्या साथीने कोल्हेंचा हा एक छावा विवेक निवडणुकीत लढला आणि अपक्ष असुनही बड्या नेत्यांच्या उमेदवारांना घाम फोडला.

खुद्द राज्याचे  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलसह पाचही जिल्ह्याचे पालकमंत्री, सत्ताधारी सह विरोधी पक्षाचे तब्बल ३४,नाशिक, नगरस सह पाच जिल्ह्यांतील सर्व खासदार, विविध राजकीय पक्षांचे बडे पदाधिकारी, पाच जिल्ह्या जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख, जिल्हाध्यक्ष, बडे शिक्षण सम्राटासह अनेक नात्यागोत्यातील बड्या हस्तींची संपूर्ण कुमक एका बाजुला झुलत होती. तर या सर्वांना अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी तगडे आव्हान देत दुसऱ्या क्रमांकाने पराभव झाला तरीही राज्यात कोल्हेंच्या एकच छावा पराभव होवूनही त्याचीच हवा अशा चर्चा रंगत आहेत.

शिक्षक मतदार संघातून विवेक कोल्हे निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केली तेव्हापासून कोल्हे यांच्या भोवती हि निवडणुक रंगतदार होती गेली. महायुतीचे उमेदवार किशोर दराडे यांना भिंती फक्त विवेक कोल्हे यांचीच होती. त्यांनी संपूर्ण निवडणूकत एकदाही महविकास आघाडीचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे यांच्या नावाची चर्चा, किंवा टिका केली नाही. माञ विवेक कोल्हे यांच्यावर निशाणा साधत होते. राज्याचे शासकीय अधिकारी, विविध तपास यंत्रणा यांच्या रडारवर विवेक कोल्हे  होते. कोल्हे यांना चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सर्वांनी केला.

एका बाजुला निवडणुकीची प्रचार यंञणा तर दुसऱ्या बाजुला कोल्हे यांच्या विविध संस्थांवर आयकर विभासह उत्पादन शुल्क व इतर तपास यंञणाच्या धाडी सुरु झाल्या. कोल्हेंना कुठे तरी अडचणीत आणुन निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला.

स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारांचा वारसा चालवणारे विवेक कोल्हे यांनी प्रचारात मुसंडी  मारुन पाच जिल्ह्यांतील सुज्ञ शिक्षकांच्या हृदयात जागा केली. अनेक शिक्षकांनी विवेक कोल्हे यांचे नेतृत्व स्वीकारले. अवघ्या २५ दिवसांत कोल्हे यांना हजारो शिक्षकांनी आपला नेता समजुन आपलंसं केले. शिक्षकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे नाशिक शिक्षक मतदार संघाच्या इतिहास प्रथमच  मुख्यमंत्र्यांना शिक्षक मतदारसंघाच्या प्रचारात येऊन तीन  बैठका, सभा घ्याव्या लागल्या.

कधीच मतदार संघात न फिरलेल्या विरोधकांना गल्ली बोळात जाऊन शोधत शोधत  शिक्षकांच्या घरापर्यंत जाण्याची वेळ कोल्हे यांच्यामुळे आली. कोल्हे यांनी या निवडणुकीने हजारो युवकांना निर्भयता, धाडस, नियोजन, प्रभावी विचार, समयसूचकता, संघटन, नैतिकता यांचे आदर्श उदाहरण सिद्ध करून देत आपलं कौशल्य दाखवले.

या नव्या पिढीच्या नव्या नेत्याला राज्याच्या राजकारणात येण्यापासून रोखण्यासाठी एकत्र आलेल्या बलाढ्य नेत्यांनी सांघीकपणाने शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत  एकट्या विवेक कोल्हेंचा पराजय  केला. हा पराजय  कोल्हेंचा होवूनही  कोल्हेंनी मोठ्या दिलाने पराभव स्विकारत विजयी  उमेदवारांचे अभिनंदन केले. शिक्षकांच्या प्रश्नासाठी यापुढेही लढण्याचा विचार व्यक्त केल्याने अनेक शिक्षक कोल्हे यांच्या पराभवाने गहीवरून  गेले.  पराजय झालेले कोल्हे आज जनतेच्या हृदयात जागा निर्माण करून स्व. कोल्हेंचा खरा राजकीय वारसा असल्याचे सिद्ध केले.