माणिकराव गावित यांच्या निधनाने संसदेतील बुलंद आवाज हरपला – कोल्हे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : सलग नऊ वेळा नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून संसदेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या माणिकराव होडल्या गावीत (८८) यांच्या निधनाने संसदेतील बुलंद आवाज हरपला अशा शब्दांत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.

       माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री म्हणून काम केले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे व स्व. माणिकराव गावित यांनी केंद्र व राज्य स्तरावर अनेक बैठकात कामकाज केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी त्यांना लोकसभेचे हंगामी सभापती पदावर काम करण्यांची संधी दिली होती.

नंदुरबार मतदारसंघातूनच स्व. माणिकराव गावीत हे त्यांच्या यशस्वी कामकाजाची सुरुवात करत. सातव्या लोकसभेपासून चौदाव्या लोकसभेपर्यंत त्यांनी नंदुरबारचे प्रतिनिधीत्व करून येथील बहुतांश प्रलंबित प्रश्न संसदेच्या पटलापर्यंत मांडून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

त्यांच्या जाण्याने आपण एका अनुभवी संसद प्रशासकाला मुकलो आहोत. कै. माणिकराव गावीत यांच्या आठवणी आणि त्यांचे कार्य आपल्यात आहे असेही बिपिनदादा कोल्हे शोक व्यक्त करताना शेवटी म्हणाले.