डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच देशाची प्रगती – विधिज्ञ लोहकणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.०६ : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधांमुळेच देशाची प्रगती असल्याचे मत जेष्ठ वकील संघाचे माजी अध्यक्ष विधिज्ञ शिरीष लोहकणे यांनी संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्गीय वाचनालयात झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण अभिवादन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सामाजिक कार्यकते माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे होते.

प्रमुख मान्यवराच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी विधिज्ञ लोहकणे पुढे म्हणाले की, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, संविधानिक योगदानामुळेच देशातील सर्वच समाजाची प्रत्येक क्षेत्रात प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. राज्यघटनेत अनेक जातीं जमातीना एकत्र  गुंफल्याने खऱ्या अर्थाने स्वतंत्र्यं, समता, बंधुता, निर्माण झाल्याने देश संविधांमुळेच प्रगतीवर आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भारत देशावर अतोनात उपकार आहेत. त्यांचे उपकार फेडू शकत नाहीत. परंतु त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी सर्व भारतीयांनी या दिवशी अभिवादन करणे हे आपले परमकर्तव्य आहे असे सांगितले. तर लक्ष्मण साबळे म्हणाले कि, देशात समता प्रस्थापित झाल्यानेच देशातील जनता गुण्या गोविदाने राहत आहे.

त्यामुळेच महिलांचाही विकास झालेला असल्याचे साबळे यांनी सांगितले. त्यानी या दिवशी सर्व ठिकाणी अभिवादन कार्यक्रम घेतात. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. ते महान असल्याने त्यांचे भारतात नव्हे संपूर्ण जगात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन केले जाते. त्यांचे ऋण आपण फेडले पाहिजे असे सांगितले.

यावेळी बाबासाहेब भोसले, मोतीराम मैंद, लोखंडे सर, डी आर निरगुडे, हबीब तांबोळी, बापू तिरुमखे, मारुती तिरुमखे, कृष्ण नवाले, दीपक कांबळे, बाळू सोनवणे, विठ्ठल जोंधळे, निलेश कांबळे, शंकर नेहे, घणघाव काका, आबू आचारी, बाळासाहबे साबळे, मधुकर मैंद आदी मान्यवर डॉ.  बाबासाहबे आंबेडकर यांच्या महानिर्वाण निमित्ताने अभिवादन कार्यमासाठी उपस्थित होते. अभिवादन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक वाचनालयाचे अध्यक्ष पंडित भारूड यांनी  केले.