कोपरगांव प्रतिनिधी, दि. ८ : माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत सहकाराच्या माध्यमांतुन त्यांच्या सर्वोच्च विकासाला प्राधान्य दिले असुन तोच वारसा कायम ठेवुन नगर जिल्ह्यात इफको खतांचा तुटवडा भासू देणार नाही यासाठी प्रयत्नशील असेल असे प्रतिपादन इफको (नविदिल्ली) संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले. तालुक्यातील कोपरगांव शिंगणापुर रेल्वेस्टेशन येथे बारा वर्षापासुन बंद झालेला इफको खत रॅक पॉईंट नव्यांने सुरू करण्यांत आला, त्याची विधीवत पुजा संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सोमवारी पार पडली.त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते.
प्रारंभी सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष अंबादास देवकर व उपाध्यक्ष बाजीराव मांजरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अहमदनगर जिल्हा इफको क्षेत्रीय अधिकारी दिनेश देसाई प्रास्तविक करतांना म्हणाले की, इफकोचे नवनिर्वाचित संचालक विवेक कोल्हे यांनी संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत कोपरगांव खत रॅक पॉईट सुरू करून शेतकरी अपघात विमा संरक्षक रक्कमेत दुपटींने वाढ करून ती दोन लाख रूपये वाढविण्यांस मंजुरी घेतली आहे. बदल ही काळाची गरज मानून इफको कंपनीने शेतकरी व त्याचे पीक उत्पादन वाढविण्यांसाठी सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करून त्यानुरूप उत्पादने बाजारात आणली आहे त्याचा वापर शेतक-यांनी करावा.
विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कोपरगांव तालुक्यासह आसपासच्या शेतकरी बांधवांना सातत्याने जाणवणारा इफको खतांचा तुटवडा लक्षात घेवुन कोपरगांव येथे सन २००७ मध्ये रॅक सुरू केला होता. मध्यंतरीच्या कालखंडात तो बंद पडला त्यामुळे आपली गैरसोय झाली तो पुर्ववत सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न केले. सहकाराच्या माध्यमांतुन शेतक-यांसह परिसराची सर्वांगीण प्रगती करायची हा वसा घेत आपलेही कार्य सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी गांवपातळीवरील सोसायटया पुन्हा सक्षम व्हाव्यात म्हणून त्याअंतर्गत शाश्वत रोजगारात वाढ करत विविध ३०० प्रकारच्या सेवा व्यवसायांचा त्यात समावेश केला ही मोठी उपलब्धी आहे.इफको द्वारे आगामी काळात आपल्या भागात नव युवकांसाठी ठोस काही रोजगार उपलब्धी व्हावी यासाठी इफकोचे सहकार्य घेणार आहे असेही ते म्हणाले.संस्थात्मक निवडणुकीत सुरवातीला पहिले अपयश आले होते मात्र नंतर सर्वत्र यश मिळाले तसेच गत निवडणुकीत बरेच काही शिकलो त्यामुळे आता विजयी घोडदौड होईल यात शंका नाही असे कोल्हे म्हणाले.
याप्रसंगी ज्येष्ठनेते दत्तात्रय कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मनेष गाडे,कार्यकारी संचालक बाजीराव सुतार,संचालक सर्वश्री.विश्वासराव महाले, बाळासाहेव वक्ते, ज्ञानदेव औताडे, निवृत्ती बनकर, शिवाजीराव वक्ते, मच्छिंद्र लोणारी, सतिष आव्हाड, बापूराव बारहाते, राजेंद्र भाकरे, बबनराव निकम, रामदास शिंदे,नानासाहेब होन,राजेंद्र लोणारी,सरपंच विजय काळे, कैलास संवत्सरकर, उपसरपंच शाम संवत्सकर,मच्छिंद्र लोणारी,नानासाहेब थोरात,कामगार युनियनचे उपाध्यक्ष गणपतराव दवंगे,विजय काळे,मुकुंद काळे,श्री रूपनर,विठ्ठल कोल्हे, भागिनाथ लोंढे,चंद्रकांत देवकर,संभाजीराव बोरनारे आदि सर्व संचालक,विविध पदाधिकारी,शेतकरी उपस्थित होते. सुत्रसंचलन इफको कोपरगांवचे क्षेत्र अधिकारी तुषार गोरड,स्टेशन मॅनेजर बी एस प्रसाद, हरिभाऊ गोरे हजर होते तर आभार भाउसाहेब वाघ यांनी मानले.
इफको द्वारे खरेदी करण्यात आलेल्या नॅनो युरिया आणि खाद यावर अपघात विमा पूर्वी पेक्षा दुप्पट करण्यात आला आहे. प्रत्येकी २ लाखापर्यंत कमाल मर्यादा असलेला अपघात विमा खाद खरेदीवर मिळणार आहे त्यासाठी केवळ खरेदी पावती जपून ठेवावी लागणार आहे.यासह शेतकऱ्यांनी ऑपरेशन अथवा गंभीर आजारावर उपचार करता किसान फंडाद्वारे वैद्यकीय मदत २५ हजार पर्यंत मिळण्यासाठी माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा अशी माहिती विवेक कोल्हे यांनी दिली आहे.