भुवनेश्वरी विजय बागडे हिचे यश कौतुकास्पद
कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : दिवसरात्र विविध प्रकारचे कामे करीत काबाडकष्ट करणारे कोपरगाव येथील विजय बागडे यांची कन्या कु. भुवनेश्वरी विजय बागडे हिने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकौंटंट ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत शहरातील भुवनेश्वरी विजय बागडे हिने घवघवीत यश संपादन करीत सीए झाली आहे. कु. भुवनेश्वरी बागडे हिने सीए होवून वडीलांच्या अपार कष्टाचे सोनं केले आहे.
आपली मुलगी खुप शिकावी तीला शिक्षणासाठी जे हवं ते देण्याची तयारी विजय बागडे यांनी केली. प्रसंगी मिळेल ते काम केले. अनेक वर्षे भाड्याने गाड्या चालवून मुलीच्या शिक्षणाला हातभार लावत बागडे यांनी मुलीच्या उच्च शिक्षणाला प्राधान्य दिले. आपल्या शिक्षणासाठी व स्वप्नपुर्तीसाठी आपले वडिल अपार कष्ट करतात याची जाणीव भुवनेश्वरी हिला पदोपदी होत होती.
वडीलांच्या कष्टाचं सोनं करण्यासाठी राञंदिवस अभ्यास करुन भुवनेश्वरी हिने थेट सीए होवून यशाचं शिखर गाठले. भुवनेश्वरी विजय बागडे हिचे पहिली ते दहावी शिक्षण कोपरगाव येथील राष्टसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे झाले. अकरावी व बारावी चे शिक्षण संजीवनी ज्युनियर कॉलेज कोपरगाव येथे झाले.
या दरम्यान विजय बागडे यांना मंगल कार्यालय व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने त्यांची अर्थीक कोंडी झाली त्यामुळे घरची परिस्थिती हालाखीची झाली होती. शिक्षण घेण्यासाठी परिस्थिती नसताना सुद्धा तिने पुढे पुणे येथे B.com ला गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स पुणे व सीए होण्यासाठी खाजगी क्लासेस पुणे कॅम्प येथे लावून सीए ची तयारी पूर्ण केले. भौतिक गोष्टींच्या मोहात न पडता ध्येयपूर्तीसाठी भुवनेश्वरी हिने अथकपणे परिश्रम घेतल्याने सी ए होण्याचं स्वप्न साकार केलं आहे. भुवनेश्वरी विजय बागडे हिच्या यशाने तिच्या आई-वडिलांचे व सर्वांचे स्वप्न पूर्ण झाले आहे .
भुवनेश्वरी बागडे ही सीए परीक्षेत यश मिळवल्या बद्दल कोपरगाव, राहता तालुक्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर, मिञ परिवार, नातेवाईक यांनी भुवनेश्वरीसह तीच्या आईवडीलांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. भुवनेश्वरी हिचे यश म्हणजे अनेकांना प्रेरणा देणारे आहे.