सामाजिक न्याय विभागाकडून कोपरगावतील ५१ रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर – आमदार काळे

कोपरगाव  प्रतिनिधी, दि. २६ : कोपरगाव मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्याची महायुती सरकारने दखल घेवून सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत कोपरगाव मतदार संघातील ५१ रस्त्यांसाठी ५ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आजपर्यंत राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग, गाव अंतर्गत रस्ते आदी महत्वाच्या रस्त्यांबरोबरच वाड्या वस्त्यांवरील रस्त्यांना देखील निधी देवून नागरिकांना येत असलेल्या मागील अनेक वर्षापासूनच्या अडचणी दूर केल्या आहेत. मतदार संघातील रस्त्यांसाठी जवळपास ४४० कोटी निधी आणला असून उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असून या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघाच्या विविध रस्त्यांसाठी अजून ५ कोटी निधी मिळाला आहे. त्यामुळे या रस्त्यांचे काम लवकरच पूर्ण होवून नागरिकांच्या अडचणी दूर होणार आहेत.

या ५ कोटी निधीतून पुढील ५१ रस्त्यांची कामे पूर्ण होणार असून यामध्ये सुरेगांव येथे रामा ७ ते अनिल वाघ वस्ती १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), मढी बु. येथे ग्रामा ३० नानासाहेब जोर्वेकर घर ते बाळू माळी घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),  संवत्सर येथे आंबादास वीर घर ते देविदास पगारे घर ५०० मी. रस्ता (दशरथवाडी) डांबरीकरण करणे(१० लक्ष), शिरसगांव येथे अशोक उकिरडे घर ते दादासाहेब साळवे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष),

मनेगांव येथे प्रकाश काले वस्ती ते रायभान गुंजाळ वस्ती १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), पोहेगांव येथे संगमनेर रोड ते नंदू औताडे वस्ती १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), सुरेगांव येथे रामा ७ ते ते रंगनाथ निकम शेत १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), मौजे माहेगांव देशमुख येथे चारी नंबर ५ ते गणपतराव रोकडे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),उक्कडगांव येथे मच्छिंद्र बागुल घर ते यादव त्रिभुवन घर (नांदगांव रोड) १ किमी रस्ता डांबरीकरण करणे (२० लक्ष), जवळके येथे संगमनेर रोड ते बिरोबा मंदिर १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष),

कोकमठाण येथे मारुती मंदिर ते समाज मंदिरा पर्यंत रस्ता कॉक्रीटीकरण करणे(१० लक्ष), सुरेगांव येथे मधुकर निकम घर ते छबू माळी घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), कोळपेवाडी येथे MDR ८५ ते  ते महेश्वर नगर (लक्ष्मी माता मंदिर) चारी नंबर पाच ५०० मी रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष), वेस येथे जिल्हा परिषद शाळा ते वेस पंचकेश्वर १ किमी रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष), चितळी येथे दिपक तेलोरे घर ते प्रकाश गायकवाड घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), शिंगवे येथे संदिप आग्रे घर ते चांगदेव पगारे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), देर्डे चांदवड येथे शांताराम मेहेत्रे घर ते नंदू कोल्हे वस्ती ५०० मीटर रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष),

जळगांव येथे लक्ष्मण गायकवाड घर ते नंदाबाई जाधव घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), मौजे रामपूरवाडी येथे रवींद्र अभंग घर ते जि.प.शाळा १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), मौजे संवत्सर येथे चारी नंबर ९ शिव रस्ता ते नवगिरे सोळसे वस्ती १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), रांजणगांव देशमुख येथे रांजणगाव स्मशानभूमी ते सुनील वर्पे वस्ती १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), कान्हेगाव येथे प्रकाश सांगळे घर ते बंकटराव जगताप घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),

संवत्सर येथे भारुड मैंद वस्ती ते रामसिंगबाबा मंदिर १ किमी रस्ता (पढेगांव चौकी पासून) खडीकरण करणे(१० लक्ष), चासनळी येथे सिताराम जानकू चांदगुडे घर ते धेनक वस्तीकडे जाणारा १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), धामोरी येथे ग्रामा १ दादा पगारे घर ते नवनाथ गोदावारे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), मुर्शतपूर येथे रोहिदास भिवा मोरे घर ते ज्ञानदेव अर्जुन मोरे घरापर्यंत १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), कुंभारी येथे कुंभारी माहेगांव देशमुख शिव चारी नं. ५ बबन पांडुरंग रायभाने घर ते शंकर दशरथ ठाकरे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष),

गोधेगांव येथे वाल्मिक सोनवणे घर ते शहादू पिराजी सोनवणे घर १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), करंजी येथे चांगदेव माळवे घर ते रामभाऊ शिंदे वस्ती (करंजी वैजापूर रोड) १ किमी रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), तिळवणी येथे वैजापूर कोपरगांव रोड ते राजश्री मनोज बागुल घर रस्ता खडीकरण करणे(०५ लक्ष), तिळवणी येथे जुने समाज मंदिर ते सीताराम पगारे घर रस्ता खडीकरण करणे(०५ लक्ष),शहाजापूर येथे बाळासाहेब घोलप घर ते भाऊसाहेब शिंदे घर रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), शहाजापूर येथे ज्ञानेश्वर मोरे घर ते ताराचंद जाधव घर रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), रांजणगांव देशमुख येथे दलित वस्ती गावठाण ते वडझरी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष),

देर्डे चांदवड येथे चांदखानबाबा मंदिर ते मस्जिद पर्यंत रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), चासनळी येथे इंडेवाडी रोड सुभाष गाडे वस्ती ते गोरख धेनक वस्ती रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), मंजूर येथे रामा ७ ते बाबुराव बर्वे घर रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),भोजडे येथे घनघाव वस्ती रस्ता कॉक्रीटीकरण करणे(१० लक्ष), वारी येथे अशोक बोर्डे घर ते MSEB रस्ता कॉक्रीटीकरण करणे(१० लक्ष), आंचलगांव येथे गोरख ठोंबरे घर ते अप्पासाहेब भालेराव घर रस्ता रस्ता खडीकरण करणे(०५ लक्ष), आंचलगांव येथे भिकन लोखंडे घर ते संजय ठोंबरे घर रस्ता खडीकरण करणे(०५ लक्ष),पढेगांव येथे पढेगांव गावठाण ते ४५ चारी सतिश पगारे घर रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष),

कासली येथे छाया रणशूर घर ते लहानू आहेर घर रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), वेस येथे दलित वस्ती अमरधाम मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे(१० लक्ष),शहाजापूर येथे चंद्रकांत खंडीझोड यांचे घराजवळील दलित वस्ती पेव्हर ब्लॉक बसविणे(१० लक्ष), चांदगव्हाण येथे नामदेव सुकदेव मोरे घर ते पद्मावती देवी मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे(१० लक्ष), मायगांव देवी येथे मायगांव देवी गाव ते केरळवाडी रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), सांगवी भुसार येथे सांगवी भुसार गाव MDR ८ ते मुखेड रस्ता लक्ष्मीआई मंदिर रस्ता खडीकरण करणे(१० लक्ष), चांदेकसारे येथे चांदेकसारे गावातील दलित वस्ती मध्ये पेव्हर ब्लॉक बसविणे(१० लक्ष), कान्हेगांव येथे हनुमानवाडी रस्ता कॉक्रीटीकरण करणे(१० लक्ष), वारी येथे जव्हार नगर मधील रस्ता कॉक्रीटीकरण करणे(१० लक्ष) या रस्त्यांचा समावेश आहे.

मागील अनेक वर्षापासूनची रस्त्यांच्या अडचणी कायमच्या सुटणार असल्यामुळे वरील गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. मतदार संघातील रस्त्यांसाठी ५ कोटी निधी दिल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथशिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे कोपरगाव मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.