जिल्हा रुग्णालय व शेवगाव ग्रामीण रुग्णालय आयोजित शिबिरात ५२१ दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप

शेवगाव प्रतिनिधी, दि. २६ : जिल्हा रुग्णालय  व शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांचे मार्गदर्शनाखाली काल शुक्रवारी (दि. २५ ) येथील ग्रामीण रुग्णालयात दिव्यांग बांधवासाठी आयोजित  केलेल्या विशेष शिबीरात तब्बल ५२१ दिव्यांग बांधवाची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आली.

      यावेळी जिल्हा रुग्णालयाचे अस्थिव्यंग तज्ञ डॉ. संदीप कोकरे, गणेश शिंदे, कान नाक घसा तज्ञ डॉ. महावीर कटारिया व ऑडिओमेट्री विभागाचे निर्मळ,  मानसिक आरोग्य विभागाचे गोरख इंगोले, मीनल  कटकोळ, श्रीमती गुंजेकर, तर नेत्र तज्ञ डॉ. साजिद तांबोळी, संतोष चौधरी यांचे पथकाने मोठे योगदान दिले.

       दिव्यांग बांधवांनी शिबिरासाठी  मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी शेवगाव  ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रत्येक व्यंगाची स्वतंत्र तपासणी व्यवस्था करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांना कोणताही त्रास झाला नाही. तसेच रुग्णालयातील अधिकार्‍यांनी दिव्यांग बांधवांना व्यवस्थित मार्गदर्शनही केले. दिव्यांग बांधवांना अचूक निदानासाठी, आवश्यक औषध उपचारासाठी तसेच प्रमाण पत्रासाठी थेट नगरला  जाणे त्रासदायक व खर्चिक होईल. त्यांचा त्रास वाचविण्यासाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले, त्याबद्दल शिबिरार्थी दिव्यागानी समाधान व्यक्त केले.

      शिबिर  यशस्वी करण्याकरता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल काळे, डॉ. गायत्री कुमावत, सदाशिव कराळे, श्रीमती संगीता राजगुरू,  रोहिणी सुतार,  आदि  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजन पूर्वक परिश्रम घेऊन यशस्वी केले.