कोल्हे कारखाना देशातील साखर उद्योगाला दिशा देण्याचे काम करणार – बिपीनदादा कोल्हे

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : देशातील साखर कारखानदारी डबघाईला येत असुन आगामी काळात सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना उसापासुन केवळ पांढरी साखर निर्माण न करता इतर वेगवेगळ्या प्रकारच्या साखरेची निर्मीती करुन  युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली देशातील इतर साखर कारखान्यांना दिशा देण्याचे काम करणार आहे. असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. 

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या साठाव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी कारखान्यांचे  मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे, कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संचालक विलासराव माळी, सौ. रंजनाताई माळी यांच्या हस्ते  विधीवत पूजा करुन करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते  बोलत होते.

ते पुढे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीचे अर्ध्यवु माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सतत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्विकार करत ग्रामीण भागातील सभासद शेतक-यांच्या शेतीचे उत्पन्न वाढावे म्हणून नाविन्यपुर्ण प्रयोगांना साथ देत ते यशस्वी करून दाखविले तोच वसा कायम ठेवुन चालु वर्षी विक्रमी उसाचे उत्पादन लक्षात घेता सभासद शेतक-यांनी स्वतःचे उसतोडणी संयंत्र, किटकनाशक फवारणीसाठी अत्याधुनिक ड्रोन, उस वाहतुकीसाठी ट्रक-ट्रॅक्टर घेवुन अद्यावत यंत्रणा उभी करावी त्यासाठी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना स्वतः काही काळ ऊस तोडणी सयंत्र, ड्रोन, ट्रॅक्टर आदी वरील व्याजाचा भुर्दंड सहन करेल अशी ग्वाही संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी देत कारखाना यावर्षी विक्रमी दहा लाख टन उसाचे गाळप, उसाचा रसापासुन इथेनॉल उत्पादन करून येणारा काळ आधुनिकीकरणासह स्पर्धेचा असल्यांने सभासद शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहे. 

साखर कारखानदारीला अनेक संकटाचा सामना करावा लागतोय. बहुतांश साखर कारखाने नफ्यात चालत नाहीत. साखर कारखानदारीला नवी दिशा देण्यासाठी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना हा केवळ  पांढरी साखर तयार करणारा कारखाना राहणार नाही तर जगातली महागडी डॅमेरा शुगर (साखर) निर्माण करण्याच्या तयारीत आहे. चालु हंगामात हि नव्या प्रकारची साखर निर्माण करण्यात कोल्हे कारखाना यशस्वी होणार आहे. डॅमेरा साखरे नंतर मिनरल शुगर(साखर)  त्याच बरोबर फ्लेवर शुगरची निर्मीती करणारा  कोल्हे सहकारी साखर कारखाना हा देशातला पहीला साखर कारखाना असणार आहे.

कारखाना यावर्षी बायोगॅसपासून सीएनजी गॅस उत्पादन करून कॉम्प्रेसर सीएनजीवर उस वाहतुक करणारे ट्रॅक्टर चालविण्याचा धाडसी पायलट प्रकल्प राबविणार आहे. उस संशोधन केंद्रातील कोईमतूरच्या २३ आणि वसंतदादा शुगर इन्स्टीटयूट पुणे यांच्या ६ हजार अशा ६ हजार २३ विकसीत उस जातीची लागवड देशांत एकमेव सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातच केल्या जातात हे वैशिष्टय आहे. प्रायोगिक तत्वावर तीन हजार सभासदांना किमान दहा गुंठे उस बेणे कारखाना मोफत पुरविणार आहे.

कोल्हे कारखान्याने या विविध प्रकारच्या साखर निर्मीतीची जय्यत तयारी केली आहे.देशातील साखर उद्योगाला नवी दिशा देण्याचे काम युवानेते विवेक कोल्हे करीत आहेत. अशी माहिती कोल्हे यांनी दिली. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक ज्ञानेश्वर परजणे, विश्वासराव महाले, बापूसाहेब बारहाते, निलेश देवकर, बाळासाहेब वक्ते, रमेश आभाळे, ज्ञानदेव औताडे, आप्पासाहेब दवंगे, राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर होन, मनेष गाडे, विलासराव वाबळे, विलासराव माळी, त्रंबकराव सरोदे, सौ. उषा संजयराव औताडे, सौ. सोनिया बाळासाहेब पानगव्हाणे,

निवृत्ती बनकर, सतिष आव्हाड, अरूणराव येवले, केशवराव भवर,साहेबराव कदम, संजय होन, दत्तात्रय पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, मधुकरराव वक्ते, दिपक गायकवाड, कामगार नेते मनोहर शिंदे, कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, मुख्य रसायन तज्ञ विवेककुमार शुक्ला, मुख्य अभियंता के. के. शाक्य, ए. के. टेंबरे, प्रदिप गुरव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, आजी माजी संचालक, सभासद कामगार मोठया संख्येने उपस्थित होते.

         प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या आंतरराष्ट्रीय साखर कारखानदारीतील प्रसंगांना उजाळा देवुन त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून युवानेते अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कामगारांच्या सुरक्षिततेला विशेष महत्व देवुन दुचाकीस्वारांसाठी मोफत हेल्मेट देवुन त्यांची मोफत आरोग्य तपासणी करणे यासह नाविन्यपुर्ण उपक्रम राबवित असल्याचे नमुद केले.  उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.