अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात सोने वाटत विजयादशमीच्या भाविकांना शुभेच्छा

शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : विजयादशमीनिमित श्रीक्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानात आज मोठया उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सायंकाळी उशीरा श्री परशुरामाची पालखी काढून शिमोलंघन करण्यात आले. भाविकांनी एकमेकांना सोने वाटत विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

    आज सकाळी श्री रेणुका आईसाहेबांना दुधाचा महा अभिषेक घालून महानैवैद्य दाखवण्यात आला. साडेअकराला महाआरती करण्यात आली. तर सायंकाळी पाच वाजता श्री परशुरामांची पालखी काढण्यात आली. देवस्थानातील विविध मंदिरात पालखी  नेऊन भाविकांनी आरती केली. प्रज्ञेश भालेराव यांचे हस्ते शमी व शस्त्र पूजन करण्यात आले. श्री रेणुका मंदिराच्या प्रवेशद्वारात  कुसुमांड बली देण्यात येऊन  मंदिर प्रवेश करण्यात आला. त्यानंतर साडेसहाला असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.

      यावेळी जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक राम  महाराज  झिंजुर्के ,पोलीस निरीक्षक विलास पुजारी, ग्रामीण आरोग्य केंद्राचे अधीक्षक डॉक्टर दीपक परदेशी, सुनील रासने , चंद्रकांत गायकवाड, रेणुका भक्तानुरागी मंगल ताई भालेराव, डॉक्टर प्रशांत नाना भालेराव ,जयंती भालेराव ,रेणुका भालेराव, रुद्र भालेराव यांचे सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्री रेणुका आईसाहेबांच्या सभामंडपात सायंकाळी चारपासून गौरेश बलदवा, राजेंद्र वाकळे, गणेश कळंबे, दीपक भारस्कर यांचे पथकाने विविध चालीवर भजन सेवा करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. रात्री साडेआठला आईसाहेबांना पौर्णिमेपर्यंत निद्रा वास देण्यात आला.