कोपरगाव तालुक्यात दोन महिलांची आत्महत्या

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव तालुक्यात दोन महिलांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत संबंधीतांविरूद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिला घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली. याबाबत ८ नोंव्हेबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. आशाबाई राधाकिसन वंजारी (वय ४५, रा. शिर्डी, ता. राहाता) यांची मुलगी निता मनोज वर्मा हिचा विवाह कोपरगाव येथील अंबिकानगर येथील मनोज कृष्णा वर्मा यांच्याशी झाला होता. तीला मोटारसायकल घेण्यासाठी पैशाची मागणी करण्यात येत होती. परंतू माहेरची परिस्थिती बेताची असल्याने पैसे देण्यास असमर्थ होते. तीचा शारिरीक व मानसिक छळ केला जात होता. या छळास कंटाळून निताने आत्महत्या केली. याबाबत आशाबाई वंजारी यांच्या फिर्यादीवरून मनोज कृष्णा वर्मा, सुरेखा कृष्णा वर्मा, व मन्या उर्फ प्रमेश कृष्णा वर्मा यांच्या विरूद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना तालुक्यातील मायगाव देवी येथे घडली. ७ नोव्हेंबर रोजी रात्री पाऊणे दहा वाजता प्रतीक्षा सोमनाथ गोंधडे (वय १९, रा. मायगाव देवी) हीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत कोपरगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उंबरकर यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.