आमदार काळेंच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर श्री गणेशाची स्थापना


कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ :
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर सालाबादप्रमाणे याहीवर्षी कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त कारखान्याचे चेअरमन आमदार काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून श्री गणेशाची स्थापना करण्यात आली मंडळाचे हे ६९ वे वर्ष आहे. यावेळी राज्यासह मतदार संघात भरपूर पाऊस पडावा व राज्यावर आलेले दुष्काळाचे सावट दूर व्हावे असे साकडे आ. आशुतोष काळे यांनी बाप्पाला घातले.

कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर दरवर्षी कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक मा. आ. अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सव विविध धार्मिक, सांस्कृतिक व मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

परंतु यावर्षी जिल्ह्यासह कोपरगाव मतदार संघामध्ये पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी सामाजिक बांधिलकी जपत आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोसाका सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळाच्या वतीने यावर्षी साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा होणार आहे.

यावेळी प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बाबा सय्यद, असि. सेक्रेटरी संतोष शिरसाठ, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली.