श्रीगणेश महाविद्यालयाचा विद्यार्थी साई याची आयआयटीसाठी निवड 

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२२ : कोऱ्हाळे येथील श्री गणेश कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी साई संजय गवळी याची आयआयटी गांधीनगर, गुजरात या संस्थेत मटेरियल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमासाठी निवड झाली. देशातील २३ प्रमुख इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे यादी जाहीर झाली, त्यात साईने श्री गणेश शिक्षण संस्थेचा झेंडा देशपातळीवर फडकवला, संस्थेच्या गणेश पॅटर्नचे हे यश आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले की साई ने यापूर्वी जेईई पूर्व परीक्षेत ९७.२८ गुण मिळविले असून, आयटी ॲडव्हान्स परीक्षेत ४६४५ रँक मिळवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान प्राप्त केला. ही परीक्षा देशभरातील १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी दिली पैकी ४१ हजार ८६२ विद्यार्थी आयआयटी ऍडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले आहे. हे लक्षात घेता साईची कौतुकास्पद कामगिरी लक्षात येते.

साईच्या या कामगिरी बरोबर यंदा झालेल्या जेईई परीक्षेत श्री गणेश शिक्षण संस्थेचे ३८ विद्यार्थी पात्र ठरले. त्यात शिवम दाते (९५.४८) प्रांजल शेटे (९४.६८), रिद्धी लहारे (९४.२२), मयूर रोडे( ८९.६८ ), विराज गोर्डे ( ८६.१२), अर्चित शेलार (८५.४५) गुण मिळविले. प्रांजल शेटे, अर्चित शेलार, सिद्धेश दवंगे, साक्षी तासकर, जय होन या विद्यार्थ्यांचा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला. प्रा. सुनील गोर्डे, प्रा. प्रवीण दहे, प्रा. सागर हिंगे, प्रा. नंदलाल आहेर, प्रा. योगेश फटांगरे आणि प्रा. बाजीराव जावळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

श्री गणेश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. विजय शेटे, उपाध्यक्ष संदीप चौधरी, सचिव नेमिचंद लोढा, विश्वस्थ भारत शेटे, कामिनी शेटे, रवींद्र चौधरी, संदिप सोनिमिंडे, पंकज मुथा, योगेश मुनावत, स्वप्निल लोढा, सुरेश गमे, आकाश छाजेड, चिराग पटेल ,गणेश कुऱ्हाडे, प्राचार्य रियाज शेखमुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. बापू पुणेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.