कोपरगाव बाजार समितीच्या निवडणुकीत ९३ टक्के मतदान 

Mypage

घोडेबाजार वाढल्याने निवडणुकीची रंगत शिगेला

Mypage

कोपरंगाव प्रतिनिधी, दि.३० : कोपरंगाव कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या  पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९३.६९ टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सोसायटी मतदार संघातून १४१३ मतदारांपैकी १३१२ मतदारांनी मतदान केले.

Mypage

ग्रामपंचायत मतदार संघात ७७९ मतदारांपैकी ७२६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला व्यापारी मतदार संघातून १९८ पैकी १९६ मतदारांनी सर्वाधिक मतदानाचा हक्क बजावला तर हमाल मापडी मतदार संघातून ८६मतदारांपैकी ८६ जणांनी हक्क बजावून १०० टक्के मतदान करून विक्रम केला.

Mypage

सर्व मतदार संघाचे मिळून २४७६ मतदारांपैकी २३२० मतदारांनी मतदान केल्याने ९३.६९  टक्के मतदान झाल्याची माहिती सहायक निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली.सकाळ पासूनच मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी सर्वच पक्षाच्या प्रमुखांची लगबग सुरू होती.

Mypage

आपल्याच बाजूने मतदान कसे जास्तीत जास्त मतदान कसे होईल याची तरतूद केली जात होती.पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मटफं प्रक्रिया चार वाजता पूर्ण झाल्याबरोबर मतमोजणी प्रक्रियेला तातडीने सुरुवात करण्यात आली.

Mypage

व्यापारी मतदारसंघाच्या उमेदवारांत कमालीची रस्सीखेच सुरु झाल्याने या निवडणुकीत घोडेबाजाराने मोठी उसळी घेतल्याची चर्चा तालुक्यात  सुरु आहे.