कोपरगाव बाजार समितीत काळे, कोल्हे, परजणेच्या सहमतीचा एकतर्फी विजय 

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : कोपरगाव तालुक्यातील सहकारी संस्था अबाधित ठेवण्यासाठी काळे कोल्हे, परजणे यांनी अंतर्गत राजकारणाला फाटा देवून तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये निवडणूक न होवू देता एकमेकांच्या सहकार्याने बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला माञ कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीत काळे कोल्हे यांच्या सहमतीला तालुक्यातील ठाकरे सेनेसह काॅंग्रेस व   इतर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकञ वज्रमूठ बांधून हि निवडणूक बिनविरोध न करता  निवडणूक  लढण्याचा निर्णय घेतला.

अखेर काळे कोल्हे या महाशक्ती समोर निवडणुकीचा शड्डू ठोकल्याने या निवडणुकीत परिवर्तन होईल की काय अशी शंका काहींना होती माञ मतदारांनी काळे कोल्हे व परजणे यांच्या सहमतीला सहमत होवून ३ जागा बिन विरोध तर १५ जागा एक हाती निवडून देत विरोधकांचा सफाया केला. माञ काही मतदारांनी काळे ,कोल्हे ,परजणे यांच्या सोबत राहुनही विरोधी गटाच्या उमेदवारांना मतदान केले तर काही कोणालाही नाराज न करता सर्वांना मतदान करुन आपलं बाद केले तर काहींनी जाणुनबुजून आपलं मत बाद करीत करुन आपला रोष व्यक्त केल्याचे मतपञिकेवरून दिसले.

दरम्यान कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच जाहीर झाली असून १८ जागा पैकी ३ जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचीत जातीमधून रावसाहेब रंगनाथ मोकळ, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून रामदास भिकाजी केकाण तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामधून अशोक सोपान नवले यांची  संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली होती.

उर्वरित जागांपैकी सर्वसाधारण (वि.का. सोसायटी)मतदार संघाच्या ७ जागेसाठी १६ उमेदवार,महिला राखीव(वि.का. सोसायटी) २ जागांसाठी ४ ,इतर मागास वर्ग १ जागेसाठी ३ ,सर्वसाधारण (ग्रामपंचायत) २ जागांसाठी ४, व्यापारी अडते मतदार संघातून २ जागांसाठी ८ तर हमाल मापाडी मतदार संघातील १ जागेसाठी ३ उमेदवार रिंगणात उतरले होते. त्यात 

सर्वसाधारण विकास कार्यकारी सोसायटी मतदार संघातून विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे  १) बाळासाहेब गंगाधर गोर्डे (मिळालेले मते ९४०)

२) शिवाजी बापूराव देवकर ( मिळालेली मते ९६७) ३) गोवर्धन बाबासाहेब परजणे –  (१०९८) ४) साहेबराव किसन रोहम (१११२) ५) साहेबराव शिवराम लामखडे (११०३) ६) लक्ष्मण विश्वनाथ शिंदे (११०५) ७) संजय माधवराव शिंदे (१०८३)  यांनी विजय मिळवला  तर ७१ मते बाद झाली.. 

 महिला राखीव विकास कार्यकारी सोसायटी मतदार संघातून  १)मिना सर्जेराव कदम (११४७) २) माधुरी विजय डांगे (११३१) या विजयी झाल्या आहेत.  इतर मागास प्रवर्गामधून  खंडू गुंजाळ फेपाळे (१११०)  विजयी झाले.  सर्वसाधारण ग्रामपंचायत मतदार संघातील  १)प्रकाश नामदेव गोर्डे( ६३१) २)राजेंद्र शंकर निकोले (६०८)  यांचा विजय झाला. 

 व्यापारी अडते मतदार संघातून  १)रेवनाथ श्रीरंग निकम(६९) २)ऋषिकेश मोहन सांगळे(१०६)  हे विजयी झाले.  तर  हमाल मापाडी मतदार संघातून रामचंद्र नामदेव साळुंके(४७) यांचा विजय झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली.

 मतमोजणी राञी पर्यंत सुरु होती.  हि निवडणुकी प्रक्रिय पुर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी नामदेव ठोंबळ सहायक निवडणूक अधिकारी संदीप नेरे, क्षेञिय अधिकारी दीपक वाकचौरे , राजेंद्र रहाणे, वाकचौरे, सचिव नानासाहेब रणशूर, प्रशांत कोपरे, संतोष मुरडणे यांच्यासह पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्यासह पोलिस कर्मचारी यांनी सहकार्य केले.