शेवगाव प्रतिनिधी, दि. २९ : अपयशातून माणूस घडत असतो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. संघर्षाला न भिता आव्हानांना सामोरे जा,चांगले विचार पेरा, असा हितोपदेश माजी विभागिय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी येथे केला.
येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मध्ये आयोजित हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृती करंडक राज्यस्तरीय अंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धचे उदघाटन डॉ. भापकरांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव अॅड़ .विश्वासराव आठरे पाटील तर प्रमुख पाहुण्या म्हणून निर्मलाताई काटे उपस्थित होत्या.
शिक्षण क्षेत्रातील खाजगीकरण योग्य की अयोग्य ‘ हा विषय वादविवादा साठी देण्यात आला होता स्पर्धेसाठी राज्यातील विविध महाविद्यालयातून संघ सहभागी झाले होते. यावेळी छ.संभाजी नगरच्या माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाने हुतात्मा करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मृती सांधिक करंडक पटकावला. तर वैयक्तिक स्पर्धेत पुण्याच्या फिरोदिया लॉ कॉलेजच्या प्रज्वल नरवडे याने प्रथम क्रमांक पटकावला,
छत्रपती सभाजी नगर च्या माणिकचंद पहाडे कॉलेजच्या ऐश्वर्या तनपुरे हीने द्वितीय तर शेवगावच्या न्यू आर्टस कॉलेजच्या अनिकेत काटे याने तृतीय क्रमांक पटकावला. ‘ उत्तेजनार्थ अक्षता वडवणीकर (अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज ) , रामचंद्र जाधव ( विधी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर ) , आकाश मोहिते( आर्ट्स कॉलेज अहमदनगर ) यांना पारितोषिके देण्यात आली .
स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा . डॉ. गजानन लोंढे, प्रा .डॉ. शंकरराव चव्हाण, प्रा. शिवाजी नरसाळे , प्रा. राजेंद्रकुमार ढोणे यानी काम पाहिले. अॅड़ विश्वासराव आठरे पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात निवडणुकीच्या काळात शाहू, फुले, आंबेडकर महाराष्ट्राला आठवतात हे वैचारिक दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली . प्राचार्य डॉ. पुरुषोतम कुंदे यांनी प्रास्ताविक केले .समन्वयक डॉ. अशोक चोथे यांनी आभार मानले.
दुसर्या सत्रात अॅड. सुभाष पाटील लांडे, अॅड़ वसंतराव कापरे यांचे हस्ते पारितोषिकाचे वितरण
करण्यात आले. डॉ. अनिता आढाव व प्रा. अपर्णा वाघ यांनी सूत्रसंचलन केले. कार्यक्रमासाठी प्रा. राहुल ताके, प्रा. राहुल गंडे ,प्रा. रामदास कोरडे, प्रा . मीनाक्षी चक्रे तसेच प्रा. राम केदार यांनी योगदान दिले.