चुलत भावाचा बहिणीसोबत लग्न करण्याचा तगादा, पोलिसात गुन्हा दाखल

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : तालुक्यातील पूर्व भागातील खेड्यातील एका नराधम भावानेच आपल्या अल्पवयीन चूलत बहिणी सोबत लग्न करण्याचा सातत्याने तगादा करत तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने मोटर सायकलवर गावात फिरवल्याने माणुसकीला काळे फासणारी घटना घडली असून त्या बालिकेने शनिवारी रात्री उशीरा शेवगाव पोलिस ठाण्यात पोस्को अंतर्गत त्याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

        यासंदर्भातील अल्पवयीन मुलगी शेवगावातील एका महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकते. ती आपल्या गावातून एसटीने कॉलेजला ये-जा करते. तीने दिलेल्या तक्रारीत तीचा चुलत भाऊ म्हणाला “मला तू आवडते, आपण दोघे लग्न करू” असे म्हणत असे. ती त्यास नकार देई. तरी त्याने तीला सातत्याने त्रास दिला आहे. सुमारे दोन महिन्यापूर्वी त्यांच्या दोन परिवारात वादविवाद झाल्याने त्या चुलत भावाचा परिवार तालुक्याच्या पश्चिम भागातील गावात राहण्यास गेला आहे.

काल शनिवारी ( दि : ९) सकाळी मुलगी कॉलेजसाठी आली. चौकात एसटीतून उतरुन कॉलेजमध्ये जात असताना कॉलेज होस्टेलच्या गेट जवळ त्याने मोटर सायकलवर मुलीचा पाठलाग करून पाठीमागून आला व तीला आडवून म्हणाला की, थांब मला तुझ्याशी बोलायचे आहे. आणि बळजबरीने हात धरून गाडीवर बसवून शेवगाव शहरातील रस्त्यावर बळजबरीने फिरवले, व तीला म्हणत होता की, तू माझ्याशी लग्न कर, नाही तर मला दुसरी मुलगी शोधून दे. त्याला नाही म्हणून सांगून आपणास परत कॉलेजला सोडून दे असे सांगितले.

परंतु तो ऐकत नव्हता काही वेळाने एका ओळखीच्या व्यक्तीने आम्हाला सोबत बघितल्यावर त्याने तीला कॉलेजच्या गेट समोर सोडून तो निघून गेला. तेव्हा आपण खूप घाबरलो. आता घरी समजल्यावर आपल शिक्षण बंद होईल या भीतीने कोणाला काही सांगितले नाही. काही वेळाने वडील कॉलेजमध्ये आले. त्यांनी विचारले तो तुला कुठे घेऊन गेला होता? तेव्हा मी त्यांना मी माझे सोबत घडलेला प्रकार सांगितला.

त्यानंतर चर्चा करून माझे वडील मला शेवगाव पोलीस ठाण्यात घेऊन आले. मी अल्पवयीन असल्याचे माहित असून सुद्धा मला रस्त्यात अडवून माझा हात पकडून मला गाडीवर बसवून लग्नाची मागणी करीत होता म्हणून माझी चुलत भावा विरुद्ध तक्रार असल्याचे नमुद केले आहे. पोलिस उपनिरीक्षक बोकील पुढील तपास करत आहेत.