आत्मा मालिकच्या उत्कर्षा थोरातला सी.ई.टी. मध्ये 99.89% गुण, 90% च्या पुढे 28 विद्यार्थी

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १७ : विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचलित उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. कु. उत्कर्षा थोरात हिने 99.89% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम, चि. पंडित लोंढे 99.78% द्वितीय, कु. समिक्षा गवळी 99.61% तृतीय, चि. दिग्वीजय थोरात 99.48% चतुर्थ, कु. ज्ञानेष्वरी भंडारे 99.47% पाचवा, चि. श्रीकृष्ण गुरसळ 99.30% गुण मिळवून सहावा क्रमांक पटकाविला आहे. तसेच 28 विद्यार्थ्यांनी 90% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले आहे.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासाच्या दृष्टीने शिक्षणाबरोबर सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती व प्रवेश पात्रता परीक्षांची तयारी करून घेतली जाते. आकाष कोचिंग इन्स्टिट्यूट व आत्मा मालिक ज्युनिअर कॉलेज यांचे संयुक्त विद्यमाने नीट, जेईई व सीईटी प्रवेश पात्रता परीक्षांचे मार्गदर्शन करण्यात येते. यामुळेच गेल्या 4 वर्षात 29 विद्यार्थ्यांची नीट परीक्षेच्या माध्यमातून एम.बी.बी.एस. साठी निवड झाली आहे. तर 09 विद्यार्थ्यांची आय.आय.टी. व एन.आय.टी. मध्ये निवड झाली असे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले.

            अभ्यासाचे सुक्ष्म नियोजन तसेच वर्ग, वसतिगृह, अभ्यासिका, भोजन या सर्व सुविधा एकाच छत्राखाली असल्याने विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी जास्त वेळ मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून चांगली तयारी करून घेता येते. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना या परीक्षांची तयारी करणे आणखी सोपे व्हावे यासाठी आत्मा मालिकच्या वतीने शैक्षणिक टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अशी माहिती शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक यांनी दिली.

            या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे  आश्रमाचे  संत मांदिआळी, सर्व  विश्वस्त मंडळ तसेच प्राचार्य नामदेव डांगे, वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, सचिन रोठे, हरून कुरेषी, प्रविण उगले सह सर्व शिक्षक वृंदांनी अभिनंदन केले.