![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/07/contact-for-advt-1024x161.jpg)
शेवगाव प्रतिनिधी, दि. १७ : पारीक समाज सेवा संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोज तिवारी तर सचिव पदी गोकुळ पुरोहित यांची निवड करण्यात आली आहे.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/08/renuka-maltistate-1024x801.jpg)
तालुक्यातील पारीक समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा संघाचे प्रल्हाद व्यास, ओमप्रकाश तिवारी, विजय पुरोहित यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ही निवड करण्यात आली. यावेळी समाजातील गरजू गरिबांना आर्थिक, गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक तर दूर्धर आजार ग्रस्तांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन सेवा संघाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2021/07/sanjivani-group-of-institute-1024x768.jpg)
जिल्ह्यात तालुका निहाय समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन तेथे तालुका कार्यकारणी नियुक्त करून त्यानंतर जिल्हास्तरावर संघटनेची बांधणी करण्यासाठी बैठका घेण्यात येणार असून येत्या नऊ जुलैला नांदेड येथे सेवा संघाच्या राज्यस्तरीय बैठकीस जासतीत जास्त प्रतिनिधी । उपस्थित राहण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती निरीक्षक व्यास यांनी दिली.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2022/09/samata-9.50-intrest-1024x773.jpg)
बैठकीत पारीक समाज सेवा संघाची निवडण्यात आलेली शेवगाव तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे –
अध्यक्ष मनोज तिवारी , उपाध्यक्ष गणेश बोरा, सचिव गोकुळ पुरोहित, खजिनदार रघुनाथ जोशी, प्रकाश पुरोहित ; सह सचिव योगेश जोशी, मार्गदर्शक राधेश्याम तिवारी, हनुमानप्रसाद जोशी , श्याम पुरोहित.
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2020/10/sona-poly-1024x769.png)
![](http://eloksanvad.com/wp-content/uploads/2022/07/Jyoti-Patsanstha-255-CR-B-1024x615.jpg)