शेवगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची पदोन्नती

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ :  शेवगाव पोलिस ठाण्यात विविध पदांवर कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती मिळाली आहे. यात  राजू चंद्रभान ससाणे, नानासाहेब गर्जे यांची पोलिस हवालदार पदावरून पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली असून संगिता पालवे, रविंद्र शेळके, सुधाकर दराडे, किशोर काळे यांना पोलिस नाईक पदावरून पोलिस हवालदार पदी पदोन्नती झाली आहे.        

पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी नव्याने पदोन्नती मिळालेल्या सर्व पोलिस अंमलदार यांना शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. यावेळी स. पो. नि. दिपक सरोदे, आशिष शेळके, उपनिरीक्षक अमोल पवार, निरज बोकील व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.