कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलीत संजीवनी सिनिअर कॉलेजच्या अंतर्गत पुणे विद्यापीठ संलग्न बॅचलर ऑफ बिझीनेस अॅडमिनीस्ट्रेशन-इंटरनॅशनल बिझीनेस (बीबीए-आयबी) हा पदवी अभ्याक्रम इ. १२ वी नंतर ३ वर्षे शिकविला जातो. या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील १९ विद्यार्थ्यांची आकर्षक पगारावर एचसीएल स्ट्रीट या नामांकित कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नोकरीसाठी निवड केली आहे, अशी माहिती संजीवनी सिनिअर कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की, आज कोणतेही शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरूण-तरूणीला आपल्याला चांगली नोकरी मिळावी, अशी प्रबळ इच्छा शक्ती असते. पालकांना सुध्दा आपला पाल्य आपल्या डोळ्या समोर स्थिर स्थावर व्हावा ही इच्छा असते. मात्र या स्पर्धेच्या काळात नोकऱ्या मिळणे अवघड होत आहे. परंतु, संजीवनीच्या सर्वच विद्या शाखांमध्ये मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला नोकरी मिळालीच पाहीजे, या पालकत्वाच्या भुमिकेतुन संजीवनीचे व्यवस्थापन विद्यार्थ्यांना सक्षम करीत असते. यामुळे संजीवनीच्या विविध विद्याशाखांमधिल अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या कंपन्यांच्या कसोट्यांना सामोरे जावुन नोकऱ्यांच्या संधी मिळवित आहे.
अलिकडेच एचसीएल कंपनीने निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सदाशिव अजय दहिवाडकर, श्रेया अमोल आदमाने, धिरजकुमार संजय औताडे, पार्थ किरण भालेराव, साक्षी संभाजी चव्हाण, राजश्री अशोक जाधव, सुशांत शामराव जखडे, ऐश्वर्या शैलेश कायस्थ,आदिती अरूण कुलकर्णी,वेदांत हेमंत लालसरे, संजना रूपचंद माळी, मितेश किशोर नारंग, सोनाली रंजन नार्जीनारी, तेजल कैलास पांडे, अनुजा मच्छिंद्र परजणे, कार्तिक सुनिल साळुंके, राहुल रंगनाथ वाके, विशाल शंकर वाणी व अस्मीन अकिल पठाण यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्वस्त सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व प्राचार्य डॉ. एस.बी. दहिकर, विभाग प्रमुख डॉ. शामराव घोडके आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. निलेश भालेराव यांचे अभिनंदन केले. तसेच अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या विध्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला.