खासदार लोखंडे यांनी केलेल्या कामाचे श्रेय आमदार काळे यांनी लाटू नये – सरपंच औताडे

Mypage

कोपरगाव प्रतीनिधी, दि. १२ : कोपरगाव शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात नाही. शेती, विज, पाटपाणी ,रस्ते, आरोग्य अदी समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. गोदावरी कालव्यांना मिळालेल्या उशिरा आवर्तनामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका बसलेला आहे.

Mypage

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसलेला 2005 च्या समन्याय पाणी वाटपाबाबत लोकप्रतिनिधी विधानसभेत ब्र शब्द देखील काढत नाही ही बाब दुर्दैवी असून नुकतेच केंद्र सरकारच्या निधीमधून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतुन जी रस्त्यांची कामे मंजूर झाली त्याचे श्रेय आमदार काळे यांनी लाटू नये असे पोहेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल औताडे यांनी म्हटले आहे.

Mypage

केंद्र सरकारच्या निधीतून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत पोहेगाव देर्डे चांदवड ते कुंभारी रस्ता मंजूर झाला असून यासाठी  7 कोटी 81 लाख रुपये निधी मिळणार आहे. वारी कान्हेगांव ते संवत्सर रस्त्यासाठी 10 कोटी 74 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.  व ओगदी ते पढेगांव रस्त्यासाठी 4 कोटी 72 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

Mypage

सदरची कामे मंजूर होण्यासाठी पोहेगांव परिसरातील नागरिक व शिवसैनिकांनी खा. सदाशिवराव लोखंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. खा. सदाशिवराव लोखंडे यांनी ग्रामस्थांच्या व शिवसैनिकांच्या मागणीचा विचार करून वरील कामे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये केंद्राकडून मंजूर करून आणलेली आहेत. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही केंद्र सरकारची योजना असल्याचे देशातील प्रत्येक नागरिक जाणतो आहे तरीदेखील आमदार काळे वर्तमानपत्रांमध्ये बातम्या देऊन सदरची कामे मंजूर केल्याचा ढोल पिटवत आहे.

Mypage

हे चुकीचे असून आपले कुठलेही प्रयत्न नसताना खासदार लोखंडे यांनी केलेल्या कामाचे श्रेय आमदार काळे यांनी लाटू नये. तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडून तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही अमोल औताडे यांनी म्हटले आहे.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *