चिमुकल्यांच्या कलाविष्काराने डोळ्यांची पारणे फिटले – ससाणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : बौद्धिकता सिद्ध करताना बाल वयात शारीरिक विकास होणे जितके महत्वाचे आहे, तितकेच बाल वयात कला – गुण विकसित होणे ही काळाची गरज बनली आहे. त्यासाठी  ‘देश रंगीला’ या संकल्पनेच्या आधारे कोयटे विद्यालयाच्या चिमुकल्यांनी विविधतेतून एकात्मतेचे दर्शन घडविले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर केलेला नृत्यविष्कार हा कलेचे दर्शन घडविणाऱ्या कलाविष्काराने डोळ्यांचे पारणे फिटले. असे गौरवोद्गार प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुनिता ससाणे यांनी काढले.

समता चॅरिटेबल ट्रस्ट संचलित स्व. दादाप्पा खंडाप्पा कोयटे विद्यालयात  सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुनिता ससाणे, मुख्याध्यापक श्री.माधव पोटे, प्रा.यशवंत आंबेडकर, कोयटे विद्यालयाचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.स्वाती संदीप कोयटे, श्री.रंगनाथ खानापूरे, श्री.सुरेंद्र व्यास, सौ.मीना व्यास, सौ.जोत्सना पटेल,कोयटे विद्यालयाच्या अध्यक्षा सौ.सुहासिनी कोयटे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक वर्ग यांच्या  उपस्थितीत भारत देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त भारत देशाचे विविधतेतून एकात्मतेचे दर्शन घडविणारे वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ – २३ आणि वार्षिक बक्षिस वितरण समारंभ पार पडला.

कोयटे विद्यालयाचे अध्यक्षा सौ.सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ.सुनिता ससाणे यांचा सत्कार करण्यात आला तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव पोटे व कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत आंबेडकर यांचा सत्कार विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान यशवंत आंबेडकर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माधव पोटे, अध्यक्ष यशवंत आंबेडकर यांनी ही मनोगतातून चिमुकल्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराचे कौतुक केले.

मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना कोयटे विद्यालयाचे संस्थापक काका कोयटे म्हणाले की, निवारा परिसरात विद्यार्थ्यांवर संस्कार करणाऱ्या शिक्षकांच्या सोसायट्या अधिक आहे. १९९६ साली या परिसरात विद्यालयाची स्थापना करून आज २७ वर्षे पूर्ण होत आहे.विद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकांच्या असलेल्या परिसरामुळे विद्यार्थ्यांवर संस्कार, शिस्त चांगली लागते आणि सुसंस्कृत पिढी तयार होते. त्यामुळे कोयटे विद्यालय चिमुकल्यांवर संस्कार करणारे विद्यालय आहे.

प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून स्वागत गीताने वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली. त्यानंतर २०२२-२३ या वर्षात विविध स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, राजस्थान, आसाम, बंगाल, गुजरात, जम्मू काश्मीर, गोवा या राज्यातील संस्कृतीचे दर्शन त्या राज्यातील कला प्रकार सादर करून डोळ्यांची पारणे फेडणारे नृत्य सादर केले.

या विविध राज्यातील संस्कृतीचे दर्शन घडविताना उपस्थितांची मने जिंकली. तत्पूर्वी विद्यालयाच्या शिक्षिका सौ.तृप्ती कासार यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मुख्याध्यापिका सौ.आशा मोकळ यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलच्या कला शिक्षिका विभावरी नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, वाहतूक विभाग यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार समता इंटरनॅशनल स्कूलच्या मराठी विभाग प्रमुख सीमा सोमासे यांनी मानले.