कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना लढवणार

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२७ : कोपरगाव तालुक्यात होऊ घातलेल्या 26 ग्रामपंचायत निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने लढवणार असून स्थानिक उपतालुकाप्रमुख गट गण प्रमुखांनी तातडीने बैठका घेऊन सरपंच व सदस्यांचे फॉर्म भरण्याचे नियोजन करावे. अशा सूचना उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी बैठकीत केल्या आहे.

Mypage

    त्यासाठी खर्डे कॉम्प्लेक्स येथे ऑनलाइन फॉर्म भरणे व इतर अडचणी सोडवण्याकरिता स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात गट तटामुळे विकास कामांना अडथळे येत असून ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक होण्यासाठी सदस्य व सरपंच म्हणून चांगल्या उमेदवाराची आवश्यकता आहे.

Mypage

अजूनही पाणी, रस्ते, वीज, सामान्य कुटुंबाच्या अडचणी केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीला सक्षम व अभ्यासू सदस्य व सरपंचाची आवश्यकता आहे त्यामुळे गाव पातळीवर चांगले उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीत उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका सर्वांनी मांडली.

Mypage

या बैठकीत भाऊसाहेब शेळके ,कृष्णा अहिरे, अशोक कानडे, राहुल होन, विजय गोरडे, लक्ष्मण पुरी, बाळासाहेब मापारी, भाऊसाहेब मंचरे, रमेश वाकचौरे, अतुल सवत्सरकर, अशोक मुरडणर, राजेंद्र नाजगड, मच्छिंद्र नवले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *