डॉ. प्रशांत भालेराव बँकिंग आणि फायनान्स मार्गदर्शक म्हणून युगांडाला निमंत्रित

शेवगाव प्रतिनिधी, दि.१० : श्री रेणुका माता मल्टीस्टेट को.ऑप. अर्बन क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेचे संस्थापक चेअरमन, ज्येष्ठ अर्थ तज्ञ डॉ .प्रशांत भालेराव यांना युगांडातील रवांडा येथे आयोजित इंडिया – रवांडा बिझीनेस समिटमध्ये ” बँकिंग आणि फायनान्स ” या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

     इंडिया -आफ्रिका ट्रेड कौन्सिलच्या वतीने जागतिक पातळीवरील इंडिया – रवांडा बिझनेस समिट होत आहे. या समिट मध्ये येत्या तेरा डिसेंबरला अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी  “बँकिंग आणि फायनान्स ” या विषयावर देश विदेशातील उपस्थित सहभागी अभ्यासूना मार्गदर्शन करावे. असे   विनंती पत्र इंडिया -आफ्रिका ट्रेड कौन्सिलचे अध्यक्ष रामकृष्ण रेड्डी यांनी डॉ. भालेराव यांना नुकतेच पाठविले आहे.

          देशातील नऊ राज्यात १३८ शाखांच्या माध्यमातून बाराशे कर्मचाऱ्या मार्फत दहा लाखावर खातेदारांना उत्तम सेवा देण्याबरोबरच रेणुका फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य सातत्याने करणारे डॉ. भालेराव यांनी आपल्या व्यवसायाचे जाळे देशासह परदेशातही अनेक ठिकाणी पसरविले आहे. त्यामुळे यशश्वी अर्थतज्ञ म्हणून त्यांचा सर्वदूर ‘ लौकिक झाला असून देशविदेश पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. बॅकिग आणि फायनान्स या विषयात त्यांचा विशेष अभ्यास असल्याने अमेरिकेच्या ग्लोबल पीस युनिव्हर्सीटीने त्याची दखल घेऊन त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले आहे.