संजीवनीच्या इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन विभागातून जगदिशची जपानच्या कंपनीत निवड

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या २०२२- २३ बी. टेक (इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग) बॅचच्या जगदिश शरद शिंदे  या शेतकरी कुटूंबातील विद्यार्थ्याला झुईको कार्पोरेशन या जपान मधील ओसाका येथे कार्यरत असलेल्या कंपनीने संजीवनीच्या ‘इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन ’ विभागाच्या प्रयत्नाने वार्षिक पॅकेज रू २० लाखांवर नोकरीसाठी निवड केली आहे.

संजीवनीने ‘हिरामेकी सोल्युशन्स’ व ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल, जपान’ या जपान मधील कंपन्यांना अभियंते पुरविणाऱ्या संस्थांशी परस्पर समझोता करार केला असुन संजीवनीच्या प्रयत्नांना प्राप्त झालेले यश हे संजीवनीच्या ‘इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन ’ विभागाचे फलित आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी जगदिशच्या यशाबध्दल त्याचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, चिफ टेक्निकल डायरेक्टर विजय नायडू, महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. ए. जी. ठाकुर, विभाग प्रमुख डॉ. डी. बी. परदेशी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे डीन डॉ. विशाल तिडके, इडस्ट्री इन्स्टिटयूट इंटरॅक्शन विभागाचे डीन प्रा. अतुल मोकळ, प्रा. राहुल बिबवे उपस्थित होते.

कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांची ग्रामिण विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहीजे, अशी तळमळ असायची. उद्योगाभिमुख शिक्षण विद्यार्थ्यांना देता येण्याचे स्वातंत्र्य मिळण्यासाठी त्यांच्याच संकल्पनेतुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने ऑटोनॉमस दर्जा मिळविला. वेगवेगळ्याा एजन्सीज तसेच परदेशी  विद्यापीठांशी संस्थेचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांचे मार्गदर्शनाखाली सामंजस्य करार केले.

या सर्व उपक्रमांची फलनिष्पत्ती म्हणजे २०२२- २३ या शैक्षणिक वर्षात प्रथम बाहेर पडलेल्या ऑटोनॉमस बॅचच्या सुमारे ७५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रू २०  लाखा पर्यंतच्या वार्षिक पॅकेजच्या नोकऱ्या देणे शक्य झाले. तसेच ‘इंडस्ट्री-इन्स्टिटयूट इंटरॅक्शन ’ विभागाच्या पुढाकाराने ‘हिरामेकी सोल्युशन्स’ व ‘फास्ट ऑफर इंटरनॅशनल, जपान’ या संस्थांशीही करार केले आहे. या संस्थांमार्फत जापनीज भाषेचे प्रशिक्षण देण्यास विध्यार्थ्यांना मदत होत असुन या संस्था जपान मधिल इंडस्ट्रीजला अभियंते पुरविण्याचे कार्य करतात.

यापुर्वीही प्रणाली अशोक चौधरी या विद्यार्थीनीची जपान मधील हांडा हेव्ही इंडस्ट्रीज मध्ये रू २० लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली असुन आता जगदिशची निवड झुईको कार्पोरेशन मध्ये रू २० लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितिन कोल्हे यांनी जगदिश याचा जपान मधिल कंपनीत वार्षिक पॅकेज रू २० लाखांवर नोकरीसाठी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी अमित कोल्हे, डॉ. ठाकुर व विभाग प्रमुख उपस्थित होते.