एसएसजीएम महाविद्यालय ‘नॅक’ साठी सज्ज

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याच्या भूमिकेतून प्रत्येक महाविद्यालयाने नॅक करून घेणे विद्यापीठ अनुदान आयोगाने बंधनकारक केलेले आहे. यानुसार एस.एस.जी.एम. महाविद्यालयाने आत्तापर्यंत नॅकचे तीन टप्पे पूर्ण केले असून, महाविद्यालय आता चौथ्या टप्प्याची प्रक्रिया राबवित आहे.

Mypage

महाविद्यालय या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यावर असून दि. ३० व ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भेट देत असलेल्या नॅक कमिटीला सामोरे जाण्यास सर्वतोपरी सज्ज झाले आहे. यासाठी महाविद्यालयातील सर्व विभाग व घटकांनी गेली पाच वर्षे विविध निरंतर अंतर्गत मूल्यमापन, वाचन प्रेरणा दिन, वृक्षरोपण, भित्तीपत्रक, शैक्षणिक सहल, राष्ट्रीय चर्चासत्र व कार्यशाळा, विविध स्पर्धा, कर्मवीर विद्या प्रबोधिनी, असे उपक्रम राबवून आपली गुणवत्ता उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.

Mypage

महाविद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी डिजिटल लायब्ररी, पिण्याच्या पाण्यासाठी प्युरिफायर, उपहार गृह (कॅन्टीन), विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अद्ययावत वसतिगृह सर्व सोयींनी युक्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व निरंतर अभ्यासिका अशा विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच इ. टी.पी.प्लॅन्ट, कंपोस्ट खत निर्मिती, जैव गॅस, रेन वॉटर हार्वेस्टिंग इ. प्रकल्प महाविद्यालयात राबविले जात आहेत.

Mypage

शैक्षणिक व सांस्कृतिक गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीने महाविद्यालयात ‘शिक्षक आपल्या दारी’, ‘एन.सी.सी’., ‘एन.एस.एस.’, ‘विद्यार्थी कल्याण मंडळ’, ‘कमवा व शिका योजना’इ. योजना व त्या अंतर्गत कै. सुशिलाबाई शंकरराव काळे राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, रयत आविष्कार, मॉडेल प्रेझेंटेशन स्पर्धा, निर्भय कन्या अभियान, मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, थोर पुरुष व महात्म्यांची जयंती- पुण्यतिथी, इ.विविध उपक्रम राबविले जात आहेत.

Mypage

या सर्व बाबींमुळे महाविद्यालयाचा परिसर लक्षवेधक, समृद्ध व प्रसन्न बनला असून गुणवत्ता हमीचा विश्वास विद्यार्थी व पालकांकडून व्यक्त होत आहे. यासाठी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हा. चेअरमन ॲड. भगिरथ शिंदे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.
याचाच एक भाग म्हणून दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी रयत शिक्षण संस्थेच्या मॉक टीम मधील प्राचार्य डॉ.अरुण आंधळे, प्राचार्य डॉ.
एन.एस. गायकवाड, प्रा.डॉ. सुनील चोळके यांनी महाविद्यालयाची पाहणी करून मौलिक सूचना केल्या आहेत.

Mypage

तसेच, या पाहणीतून सर्वांनी महाविद्यालयाने केलेल्या तयारीबाबत समाधान व्यक्त करून नॅक मूल्यांकनासह उच्चतम श्रेणी मिळण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दिनांक ३० व ३१ ऑगस्ट रोजी नॅक समिती महाविद्यालयाला भेट देत आहे. या भेटीदरम्यान होणाऱ्या पालक व माजी विद्यार्थी बैठकीसाठी मोठ्या संख्येने पालक व माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. रमेश सानप, नॅक समन्वयक डॉ.निलेश मालपुरे, माजी विद्यार्थी समिती प्रमुख प्रा .डॉ.मोहन सांगळे

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *