विकासात कोपरगाव मतदार संघ जिल्ह्यात अग्रेसर राहील – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे निधी मिळविण्यासाठी प्रेरणा मिळत असून आजपर्यंत २१०० कोटीच्या वर निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहावा यासाठी प्रयत्नशील असून तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी ठेवा कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली आहे.

कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे येथील ४० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या एंडकी नाला रस्ता व गोरक्षनाथ रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले कि, मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी निधी दिल्यामुळे रस्ते, पाणी, आरोग्य अशा विविध समस्या सुटल्या आहेत. आपण दिलेल्या आशीर्वादातून मतदार संघासाठी २१०० कोटी निधी आणला असून हजारो कोटीचे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत.

त्यामुळे येत्या काळात मतदार संघासाठी अजून निधी मिळणार असून मतदार संघातील सर्वच विकास कामे मार्गी लागणार आहेत. येत्या काळात विकासाचे बहुतांशी प्रश्न सुटलेले असतील असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला. चांदेकसारे व सोनेवाडीच्या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी आ. आशुतोष काळे यांनी पूर्ण करून या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ झाल्यामुळे चांदेकसारे व सोनेवाडीच्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यावेळी आनंदराव चव्हाण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, माजी संचालक सचिन रोहमारे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, गौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापुराव जावळे, रोहिदास होन, सरपंच किरण होन, उपसरपंच सचिन होन, नंदकिशोर औताडे, सुनील माळी, पोपट होन, अशोक होन, किशोर होन, केशव जावळे, किशोर ढमाले, विलास चव्हाण, जालिंदर होन, लक्ष्मीकांत होन, पुंजाभाऊ होन, तुळशीदास होन, रामजी ढमाले, द्वारकानाथ होन, धीरज बोरावके, शंकरराव गुरसळ, दौलत गुरसळ, बबलू सय्यद, 

बाळासाहेब खंडिझोड, हसन सय्यद, ताजुभाई सय्यद, मनोज होन, हरिभाऊ जावळे, सोपान गुडघे, काशिनाथ होन,कर्णासाहेब चव्हाण, मलू होन, द्वारकानाथ होन, दादासाहेब होन, मच्छिन्द्र होन, आप्पासाहेब होन, दौलतराव होन, सुनील होन, गंगाधर खोमणे, शंकरराव जावळे, अण्णा गाढे, संदीप पवार, राजकिशोर जाधव, किसन काटकर, शरद होन, सतीष पवार, नारायण होन, अनिल बावके, दादासाहेब जावळे, संजय गुजर, भगवान होन, आबा दहे, निरंजन जावळे, शिवाजी जावळे, किरण पवार, किरण होन, 

राहुल होन, भिवराव दहे, भाऊसाहेब होन, भास्कर होन, रावसाहेब होन, बापू होन, प्रभाकर होन, चंद्रकांत होन, पंकज होन, रविंद्र खरात, कांतीलाल होन, किरण अर्जुन होन, रावसाहेब होन, नुरमहम्मद शेख, मधुकर खरात, डॉ. घोंगडे, राजु होन, माऊली पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, ग्रामसेवक भैरवनाथ नाडेकर, उमेश कोल्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.