शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : श्री क्षेत्र अमरापूर शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन ठिकाणच्या शेतात सौर उर्जेच्या प्लेटा व विद्युत मोटार असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला गेला. तसेच चोरट्यांनी जाताना शेतातील पाईप लाईनची तोडफोड करून व काही क्षेत्रातील कपाशी उपटून मोठे नुकसान केले आहे.
या संदर्भात भारत मोटकर यांनी आपल्या आव्हाने रस्त्यावरील शेतातील विहिरवर बसविलेल्या सौर उर्जेच्या १५ प्लेटा चोरीला गेल्याची तसेच शेतातील कपाशीची बरीच झाडे उपटून नुकसान केल्याची फिर्याद शेवगाव पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी ८० हजाराचे नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसात तालुक्यात विजेचा खेळ खंडोबा चालू आहे. दिवसा काठी तीन चार तासापेक्षा अधिक विज नसते. त्यामुळे विहिरीला पाणी असूनही पीकांना पाणी देणे अशक्य झाल्याने परिसरातील पिके जळू लागली आहेत. नाईलाजाने अनेक शेतकर्यानी स्वखर्चाने सौर उर्जेचे पंप बसविले आहेत. तर तेही चोरट्यांच्या नजरेतून सुटले नाहीत. शेतकर्यावर अस्मानी व सुलतानी दोन्ही संकटे येत आहेत. हे शेतकऱ्याचे दूर्दैव आहे. दीपक क्षिरसागर पिडीत शेतकरी, श्री क्षेत्र अमरापूर.
तर याच वेळी श्री रेणुका माता देवस्थानचे मागील बाजूस काही अंतरावर दीपक शंकर क्षिरसागर यांच्या शेतातील विहिरीवरील सौर उर्जेची पाच आश्व शक्तीची मोटार व स्टार्टर चोरीला गेला आहे. येथील सौर उर्जेच्या काही प्लेटाची मोडतोड झाली असू शेवगाव पोलिसांनी पंचनामा केला आहे. फिर्याद दाखल करण्याचे काम उशीरा पर्यंत चालू होते. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, विभागीय पोलिस उपअधिक्षक सुनिल पाटील यांचे मार्गदर्शना खाली हवालदार नेताजी मरकड, प्रशांत आंधळे तपास करत आहेत.