संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थी परीषद समितीचा पदग्रहन समारंभ संपन्न

शालेय जीवनातच लोकशाही मुल्यांची रूजवण

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १७ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  (एसजीआय) संचलित शिर्डी  येथिल संजीवनी इंटरनॅशनल स्कुलच्या चालु शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थी परीषद समितीची निवड लोकशाही पध्दतीने निवडणुक घेवुन निवडुन आलेल्या विद्यार्थी सदस्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात साजरा झाला.

शालेय  जीवनातच लोकशाहीची मुल्ये या स्कूलने रूजविण्याचा प्रयत्न केला आहे. या समारंभास एसजीआयचेे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व शिर्डी  नगरपरीषदेचे माजी उपनगराध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सुजित गोंदकर यांची प्रमुख उपस्थिती होती, अशी माहिती स्कूलच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 एसजीआयचेे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व स्कूलच्या संचालिका डॉ. मनाली कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या सदस्यांचे अभिंनदन करून वर्षभराच्या कामकाजास शुभेच्छा दिल्या. पत्रकात पुढे म्हटले आहे की मुलांमध्ये स्वरीत भूषण भलगटीया याने सर्वात जास्त मते मिळवुन विद्यार्थी प्रतिनिधी  (हेड बॉय) पदाचा मानकरी ठरला तर मुलींमध्ये जुई अजित पाटील ही उपप्रतिनिधी पदाची मानकरी ठरली. शालेय क्रीडा प्रमुख पदावर पार्थ भाऊराव गांगुर्डे, सांस्कृतिक प्रतिनिधी पदावर आरव अतुल नखरा, शालेय शिस्त  प्रतिनिधी पदावर शास्वत समरेंद्र कुमार व विद्यार्थी सभापती पदावर आर्या राय हिची निवड झाली.

तसेच वर्षभर विविध कामकाज पाहण्यासाठी विविध हाऊसेसच्या प्रतिनिधिंचीही निवड करण्यात आला. यात तक्षशिला हाऊसच्या कॅप्टन पदावर साची विरेश  अग्रवाल व उप कॅप्टन पदावर अर्चित प्रशांत कडू, विक्रमशिला  हाऊसच्या कॅप्टन पदावर स्वरा विजय घोडेराव व उपकॅप्टन पदावर सिध्दी महेंद्र तांबे, नालंदा हाऊसच्या कॅप्टन पदावर वल्लभ अनिल कोते व उपकॅप्टन पदावर पृथ्वीराज साईकुमार माळवदे, इंद्रप्रस्थ हाऊसच्या कॅप्टन पदावर विरा राहुल विखे व उपकॅप्टन पदावर भुवी स्नेहल कोठारी यांची निवड झाली आहे.

प्राथमिक विभागामध्ये विश्वसाई प्रितम वडगावे याची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणुन तर उप्रपतिनिधी म्हणुन तपस्या लांडगेची निवड झाली आहे. प्राथमिक विभाग क्रीडा प्रुमुख म्हणुन विदिशा शिवाजी गोंदकर हिची, सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणुन सई राहुल गोदकर व शिस्त समिती प्रतिनिधी म्हणुन पियुष पंकज संकलेचा यांची निवड झाली आहे. या सर्वांना प्रिन्सिपल डायरेक्टर सुधा सुब्रमण्यम यांनी पद व गोपनियतेची शपथ दिली. यावेळी प्राचार्या सौ. डॉ. संतोश शर्मा, हेड मिस्ट्रेस रेखा साळुंके, पालक व शिक्षक उपस्थित होते.

सदर प्रसंगी एसआयएस टॉक या कार्यक्रमांतर्गत राजविका अमित कोल्हे हिने भारतातील महिला व बाल विकास मंत्री सौ. अन्नपुर्णा देवी, श्रीजल निखिल बोरावके याने अलेक्स एलिस (इंग्लंड) ब्रिटिश  हाय कमिशनर, मेरिष्का सबलोक हीने मलाला युसुफझाय (पाकिस्तन) शांतीराजदुत, मीत कोली यांने एरिक गारसेटी (अमेरिका) राजदुत व नोरगीलोन (इस्त्राईल) टेक्नॉलॉजी राजदुत यांची भुमिका साकारून आरोग्य, तंत्रज्ञान, शिक्षण  व शास्वत विकास उद्दिष्टे अशा  विविध विषयांवर चर्चा करीत कार्यक्रम सादर केला. राजश्री योगेश आढाव व भक्ती सतिश  पानगव्हाणे यांनी सुत्रसंचालन केेले. क्रीडा शिक्षक  विरूपक्ष रेड्डी गीतु जोशी  यांनी निवडणुक प्रक्रिया पार पाडण्यासाठी विशेष  परीश्रम घेतले.