शेवगाव प्रतिनिधी, दि.१८ : माझी वसुंधरा फेम आदर्श गाव, वाघोलीचे युवा कार्यकर्ते उमेश भालसिंग यांना महाराष्ट्र राज्य’ हिंदवी परिवाराच्या वतीने देण्यात येणाऱ्या’ सह्याद्री युवा रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या वर्षीच्या पन्हाळा पावनखिंड मोहिमेची सांगाता नुकतीच झाली. याप्रसंगी हिंदवी परिवाराचे प्रणेते, प्रसिद्ध शिव चरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे याचे हस्ते पन्हाळ गडावर हा पुरस्कार देऊन भालसिंग यांना गौरविण्यात आले.
यावेळी नागपूर येथील ज्येष्ठ उद्योगपती झिजकर, केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार याचे स्वीय सहाय्यक ओम प्रकाश शेटे, पन्हाळ्याचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक उपस्थित होते. भालसिंग तब्बल१३ वर्षा पासून किल्ले भ्रमंती मध्ये हिंदवी परिवारा समवेत सहभागी होत असल्याने या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली .
सन्मान सोहळ्यानंतर भालसिंग यांनी सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, हा सन्मान माझ्यासाठी इतर कोणत्याही सन्मानापेक्षा अधिक मोलाचा आहे. प्रत्यक्ष रणभूमीवरती नरवीर शिवा काशीद व नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या रक्ताने पावन झालेल्या भूमीमध्ये सन्मान होणे ही अविस्मरणीय बाब आहे. हा सन्मान वाघोलीकरांचा प्रतिनिधी या नात्याने मी स्वीकारला असून, या सन्मानाचे खरे मानकरी माझे ग्रामस्थ आहेत.