आपल्या कामातच देव पाहावा – अभिमन्यू महाराज

शेवगाव, प्रतिनिधी दि.19 : ईश्वराच्या भक्तीसाठी आपला कामधंदा सोडण्याची आवश्यकता नाही. सावता महाराजांनी दिलेल्या शिकवणुकीनुसार कामांमध्ये देव पहावा व नित्याचे कामकाज करत असताना केलेली भक्ती देखील विठ्ठलास भावते असे प्रतिपादन अभिमन्यू महाराजांनी येथे केले.

तालुक्यातील माझी वसुंधरा मोहिमेत राज्य स्तरिय प्रथम पुरस्कार प्राप्त वाघोलीमध्ये आयोजित कीर्तनात ते बोलत होते. ग्रामपंचायत सदस्य राजेद्र जमधडे, यानी नित्यनियमीत कामे म्हणजे फक्त वैयक्तिक कामे असे न समजता सामाजिक कामे व गावातील वेगवेगळ्या उपक्रमात सहभाग या कामाचाही त्यात अंतरभाव गृहीत आहे. असे मत व्यक्त केले.

यावेळी जगदीश जमधडे, आदिनाथ जमधडे, आप्पासाहेब जमधडे, अशोक तुपे, शेषराव जमधडे, भरत गाडगे, गणेश जमधडे, बंडू भालसिंग, दादासाहेब जगदाळे, बंडू जमधडे, सुभाष दातीर, सोपान जमधडे, यांच्यासह वाघोली गाव व परिसरातील नागरिक महिला अबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. किर्तनानंतर महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.