कोळपेवाडीच्या महेश्वर मंदिरातील दानपेटी चोरीला

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : तालुक्यातील कोळपेवाडी पंचक्रोशीचे आराध्य दैवत महेश्वर मंदिरातील दान पेटी बुधवारी पहाटे चोरीला गेल्याची घटना सि.सी टिव्ही कॅमेरा मध्ये नोंद झाल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध करत पोलीसांनी त्वरित चोर जेरबंद करण्याची मागणी पुढे आली आहे.

   कोळपेवाडी पंचक्रोशीचे आराध्य दैवत महेश्वर मंदिरातील दान पेटी बुधवारी पहाटे तोंडाला मास्क बांधलेल्या दोघांनी चोरुन नेल्याची घटना सी सी टिव्ही कँमेर्या मध्ये नोंद झाल्याने सकाळी ग्रामस्थांनी एकत्र येऊन घटनेचा निषेध करत पोलीसांनी त्वरित चोर जेरबंद करण्याची मागणी पुढे आली. घटनास्थळी कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट देवुन चोरीचा घटना क्रम तपासत ग्रांमस्थाना चोरांचा लवकरच तपास करुन त्यांना ताब्यात घेऊ असे आश्वासन दिले.

महादेव मंदिराचे पुजारी झोपत असलेल्या रुमला बाहेरून कडी लावून खंडोबा मंदिराचे कुलुप तोडुन मंदिरात तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन चोरांनी महेश्वर मंदिराच्या गाभाऱ्या समोरील वजनाने जड असलेलीच दान पेटी चोरुन नेली सकाळी आरती च्या वेळेस ग्रांमस्थाना दानपेटी चोरीला गेल्याची घटना आढळून आल्याने सी सी टिव्ही कॅमेरे चेक केले असता दोन चोर पहाटे दानपेटी घेवुन जाताना आढळले गावच्या पश्चिम दिशेला चांगदेव बारकु पाटील विद्यालया मागील चारीत दानपेटी तुटलेल्या अवस्थेत विद्यार्थ्यांना आढळुन आली.

माजी सरपंच सुर्यभान कोळपे यांनी दानपेटी मध्ये जवळपास २० हजारांहून अधिक रक्कम असल्याचा उल्लेख करत चोरीच्या घटनेचा निषेध व्यक्त केला. कोळपेवाडी – सुरेगाव परिसरातील पंधरा दिवसातील चोरीची हि तिसरी घटना आहे. परिसरात दुकान फोडीच्या शेकडो घटना घडुन देखील अद्याप एकाही चोरीचा तपास पोलीस यंत्रणा लावु शकली नसल्याने चोरांनी मंदिराच्या दान पेट्याना लक्ष केले आहे.

कोळपेवाडी पोलीस आउट पोस्ट हे केवळ नावालाच असुन येथिल कर्मचारी तालुका पोलीस ठाण्यातील सेवेत कार्यरत असल्याने कुलुप बंद आउट पोस्ट गुन्हेगारांना मोकळीक देत असल्याचे ग्रामस्थ बोलुन दाखवत आहे.