दिव्यांग मतदारांचा मतदान यादीत दिव्यांग उल्लेख करावा – चांद शेख

शेवगाव प्रतिनिधी, दि. १८ : महाराष्ट्र राज्य शासन यांच्या कडून दिव्यांग मतदार नोंदणी तसेच ज्यांची नावे मतदार यादीत आहेत अशा दिव्यांग बांधवांना निवडणुक दरम्यान मतदान करतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, सर्व प्रकारे उपयुक्त अशा सोई सुविधा पुरवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासन स्तरावरून उपाययोजना केल्या जातात. यासाठी शिबीर आयोजित केले जातात.

परंतू मतदार नाव नोंदणी करणारे बीएलओ तसेच येथील निवडणूक विभागाकडून  दिव्यांग असा उल्लेख केला जात नाही. ज्या दिव्यांग व्यक्तींचे नाव मतदार यादीत आहे त्यांच्यापुढे दिव्यांग असा बेंच मार्क उल्लेख असणे गरजेचे असतांना नोंद होत नसल्याच्या तक्रारी असल्याचे सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी निवेदनात म्हटले आहे.

  तहसील कार्यालयात देखील जाऊन मतदान कार्ड मध्ये दिव्यांग अशी दुरुस्ती करणेबाबत पाठपुरावा केला तर निवडणूक विभागात उडवा उडवीची उत्तरे देऊन तासंतास उभे केले जाते . तरीही मतदान कार्ड मध्ये दिव्यांग अशी दुरुस्ती करावी. तरी सर्व बीएलओ व निवडणूक विभागातील संबंधितांना तशी नोंद घेण्या बाबत सूचना द्याव्यात असे तहसीलदाराना देण्यात आलेल्या निवेदनात  म्हटले आहे.  

अन्यथा सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष चांद शेख उपाध्यक्ष संभाजी गुठे, सचिव नवनाथ औटी, संघटक खलील शेख, कार्याध्यक्ष अनिल विघ्ने, शहर अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनिल वाळके, सचिव गणेश तमानके, महिला जिल्हा अध्यक्षा निर्मला भालेकर १५ ऑगस्टला आंदोलन करतील असेही नमुद आहे.