खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी आत्तापासूनच पाठपुरावा सुरु – आमदार काळे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : मतदार संघ पर्जन्यछायेखाली येत असून, आपल्याकडे दरवर्षी पडणारा पाऊस हा जेमतेमच असतो. परंतु यावर्षी पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याच्या मार्गावर असताना अजूनही मतदार संघात समाधानकारक पाऊस झालेला नाही.

Mypage

येत्या काही दिवसात जर पाऊस झाला नाही, तर खरिप पिकांचे किती नुकसान होईल याची कल्पना न केलेलीच बरी, त्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी पिक विम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल. यासाठी आत्तापासूनच पाठपुरावा सुरु करणार असल्याचे आमदार काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील मढी खु. येथे एका कार्यक्रम प्रसंगी सांगितले.

Mypage

कोपरगाव तालुक्यातील मढी खु. येथे आ. आशुतोष काळे यांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रसाद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कोळपेवाडी व आ. आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्वरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. आशुतोष काळे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, मोफत आरोग्य तपासणी शिबीर हा स्तुत्य उपक्रम असून अशा शिबिरांचा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या गरजू रुग्णांना लाभ होत असून, अशी शिबिरे राबविणे काळाची गरज आहे.

Mypage

संपूर्ण मतदार संघातील शेतकऱ्यांनी सुरुवातीला पडलेल्या अत्यल्प पावसावर खरिपाच्या पेरण्या केलेल्या आहेत. परंतु पावसाळा सुरू होवून जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी होत असून, खरीप पिकांना पावसाची अत्यंत आवश्यकता आहे. जर येत्या चार दोन दिवसात समाधानकारक पाऊस पडला तर शेतकऱ्यांच्या पदरात काही तरी पडेल अशी आशा आहे. परंतु जर पाऊस पडलाच नाही तर शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होणार आहे.

Mypage

त्यामुळे अशा लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची पिक विम्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे आत्तापासूनच पाठपुरावा करणार असल्याचे आमदार काळे यांनी सांगितले.

Mypage

या कार्यक्रमात मागील गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला जिल्ह्यात सर्वाधिक दर दिल्याबद्दल आमदार काळे यांचा उपस्थित शेतकऱ्यांनी सत्कार केला. कार्यक्रम प्रसंगी वैजापूरचे आ. प्रा. रमेश बोरणारे यांनी योगीराज श्री सदगुरु गंगागिरीजी महाराज यांच्या वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण आमदार काळे यांना दिले आहे.

Mypage

याप्रसंगी नॉलेज सिटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रकाश कोळपे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, सुभाष आभाळे, मोहनराव आभाळे, भाऊसाहेब कुऱ्हाडे, अजय गवळी, उत्तम कुऱ्हाडे, सुधाकर कुऱ्हाडे, श्रीधर आभाळे, सोपानराव आभाळे, राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे, सरपंच सुनील भागवत, उपसरपंच लीना आभाळे, बिपिन गवळी, भारत आभाळे, मोहन वाकचौरे, प्रकाश आभाळे, जिजाबापू आभाळे, शंकर आभाळे, सुकदेव भागवत, मोहन वाकचौरे

Mypage

आबा आभाळे, शिवाजी आभाळे, रवी आभाळे, ललित आभाळे, प्रमोद आभाळे, नारायण आभाळे, बाबासाहेब आभाळे, गोरख रहाणे, संचित काळे, धनंजय आभाळे, पंकज गवळी, अजय आभाळे, अमोल आभाळे, अमोल माळी, पोपट दुशिंग, पुष्पा आभाळे, लंका कासार, बादशहा माळी, माधव कासार, भीमराज भागवत, बाबासाहेब गवळी, अरुणा तिवारी, प्रदीप कुऱ्हाडे, नंदकिशोर औताडे, प्रकाश गवळी, शिवाजी आभाळे, राजेंद्र पवार, रोहन आभाळे, नितीन पवार, दादासाहेब त्रिभुवन, रंगनाथ गवळी, वसंत भागवत

Mypage

राजेंद्र आभाळे, दीपक सूर्यवंशी, गणेश आभाळे, सुनील गवळी, बाळाजी गवळी, मुख्याध्यापक माळी डॉ. गंगासागर कोळपे, डॉ. अतुल गायकवाड, आरोग्य अधिकारी डॉ. ऋषिकेश खटकाळे, डॉ. आयुब शेख, डॉ. बाळासाहेब जाधव, प्रशांत गवळी, विजय आभाळे, सुनील मोकळ, योगीराज देशमुख, मढी बु. उपसरपंच निवृत्ती गवळी, कैलास डूबे, मच्छिंद्र गवळी, अजय गवळी, प्रकाश देशमुख, नचिकेत आभाळे, अनिल गवळी, गोरख आभाळे, रंभाजी आभाळे, सुभाष आभाळे, शिरू पोटे, गायत्री गवळी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *