वंचित घटकांच्या आर्थिक उन्नतीत स्नेहलता कोल्हे यांचा सिंहाचा वाटा – साहेबराव रोहोम

कोपरगांव प्रतिनधी, दि. ९ : भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे यांनी वंचित घटकाबरोबरच गोर-गरीब, उपेक्षीत महिलांच्या आर्थिक उन्नतीत मोलाचा सहभाग दिला असल्याचे प्रतिपादन भाजपाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केले. तालुक्यातील मौजे शिरसगांव व कोळपेवाडी येथे सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. 

             याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, उत्तमराव चरमळ, अंबादास पाटोळे यांची भाषणे झाली. सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक विश्वासराव महाले यांनी सौ. कोल्हे यांच्या विधानसभा काळातील विकास कामांची माहिती दिली. 

             तर कोळपेवाडी येथे संजीवनीचे माजी उपाध्यक्ष निवृत्ती कोळपे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांवसह संजीवनी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यांवर भर दिला. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी कार्य क्षेत्रातील उसाचे उत्पादन वाढीसाठी धडक मेळावे घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जात मार्गदर्शन केले. युवानेते विवेक कोल्हे आधुनिक विचारसरणीचे माध्यमांतून युवा शक्तीला उभारी देतात असे संचालक राजेंद्र कोळपे, विलासराव वाबळे, सोपानराव पानगव्हाणे यांनी सांगितले. याप्रसंगी एल-डी. पानगव्हाणे, शब्बीरभाई शेख, पुंजाजी राऊत, बाबासाहेब पानगव्हाणे यांची भाषणे झाली.

                याकार्यक्रमप्रसंगी श्री. त्रिंबकराव सरोदे, श्री. शिवाजीराव भगुरे, श्री. रावसाहेब जाधव, श्री. शिवाजीराव जाधव, श्री. अशोकराव गायकवाड, श्री. अशोक भानुदास पा. शिंदे, श्री. अशोक निवृत्ती पा. शिंदे, श्री. किसन गव्हाळे, श्री. संतोष भागवत, श्री. प्रकाश शिंदे, श्री. सुदाम कर्पे, श्री. सुदाम शिंदे, श्री. आप्पासाहेब शिंदे, श्री. रंजन साळुंके, श्री. आप्पासाहेब रांधवणे, श्री. हबिबभाई पटेल, श्री. केशवराव गायकवाड, श्री. प्रकाश गव्हाळे, श्री. दत्तू पाटोळे, श्री. आसाराम गव्हाळे,

श्री. दादा पा. सुंभे, श्री. परसराम गव्हाळे, श्री. वाल्मिक भुजाडे, श्री. कैलास पाटोळे, श्री. मनोज तुपे, श्री. परशराम पा. वाबळे, श्री. भाऊसाहेब पा. कोळपे, श्री. शिवाजी कदम, श्री. नानासाहेब पंडोरे, श्री. बाबासाहेब निंबाळकर, श्री. राजेंद्र कोळपे, श्री. किरण कोळपे, श्री. वसंतराव लकडे, श्री. बाबासाहेब कोळपे, श्री. पोपटराव जुंधारे, श्री. सुखदेव कोळपे, श्री. भिकनराव कोळपे, श्री. शब्दीरभाई शेख, श्री. प्रकाशराव जुंधारे, श्री. अशोक ढोणे, श्री. अर्जुन कोळपे, श्री. म्हाळु कोळपे,

श्री. पोपटराव निळकंठ, श्री. भगवानराव मोकळ, श्री. रामनाथ कोळपे, श्री. कृष्णकांत गवळी, श्री. वसंतराव कुलकर्णी, श्री. वसंतराव पानगव्हाणे, श्री. संतोष जाधव, श्री. प्रवीण पानगव्हाणे, श्री. अमोल गवळी, श्री. प्रशांतराव वाबळे वसंत थोरात,यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते शिरसगाव, कोळपेवाडी, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी शब्बीरभाई शेख यांनी आभार मानले.