कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यामंदिर कोपरगाव येथील कलाशिक्षक अमोल बाळासाहेब निर्मळ यांनी १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्य दिनाच्या ७७ वा वर्धापन दिन समारंभा निमित्त चंद्रयान ३ ‘रखकर चॉद के उस पार कदम, आज हम इतिहास बना देंगे, और जिनको शक था हमारी काबीलीयत पर, आज उन सबको गवाह बना देंगे’, हा संदेश देऊन भारतीय इस्त्रोच्या या कामगीरीचे आभिमान वाटणारे फलक चित्र रेखाटण केले आहे.
निर्मळ यांचे फलक रेखाटन हे सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक अशा अनेक विषयांवर फलक रेखाटन करून देशसेवेचा संदेश दिलेला आहे. १५ ऑगस्ट निमित्त चंद्रयान ३ इस्त्रोच्या कामगीरीचे फलकावर रेखाटलेले चित्र ही एक आकर्षणाचा विषय झाला आहे. त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाला सोशल मिडीयाच्या माध्यमातुन चांगला प्रतिसाद मिळाला असुन त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.