शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : गेली दहा वर्षांपासून आमदार असताना मी कधीही भेदभाव न करता शेवगाव व पाथर्डी या दोन्हीही तालुक्यात विकासाची समान कामे करण्याचा सातत्त्याने प्रयत्न केला असून मतदार संघाचा जेवढा विकास करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले. तालुक्यातील मुंगी, दहिगाव- शे,बोधेगावसह सोनविहीर ते कांबी या मार्गाच्या कामासाठी १३ कोटी ६० लाख रुपये निधीच्या विविध कामाचा भूमिपूजन समारंभ आ. राजळे यांचे हस्ते झाला त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून मतदार संघात शासनाच्या वेगवेगळ्या माध्यमातून मोठा भरीव निधी उपलब्ध झाल्याने मतदार संघातही विकास कामाचा अनुशेष भरून निघाला असून जी विकासाची कामे बाकी आहेत ती पूर्ण करण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणारअसल्याने विरोधक फक्त निवडणुकीसाठी बाहेर पडले असून कुणी शिवार फेरी तर कुणी जनसंवाद परिवर्तन यात्रा काढून तुम्हाला भुलवण्याचे प्रयत्न करत आहेत.
मात्र तुम्ही अशा भुलथापांना बळी पडू नका. राज्य शासनाने राज्यातील महिला व पुरुषासाठी तसेच बेरोजगार तरुणासाठी वेगवेगळ्या योजना हाती घेतल्या असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन या योजनेपासून एकही नागरिक वंचित रहाणार नाही याची काळजी घेण्याचेही आ. राजळे यांनी आवाहन केले.
यावेळी मुंगीत शिवाजी समिदर, श्रीरंग गोर्डे, भाजपचे माजी तालुका प्रमुख बापूसाहेब पाटेकर यांनी आपले विचार केले. भीमराज सागडे, पांडुरंग तहकीक,अशोक तानवडे, शरद चाबूकवार, कडुभाऊ वडघणे, सुरेश नेमाने, सर्जेराव कारंडे, सुनिल वडघणे, नारायण पाखरे, मोहन डमाळे, कुद्दूस पठाण, पांडुरंग मिसाळ, नुसरत शेख, दादा देवढे, रामा साबळे, उमाजी राजेंभोसले, नितीन जाधव, व विजयाताई मिसाळ तर बोधेगावी राम केसभट,कासमभाई शेख, प्रा. भाऊसाहेब मुरकुटे, हरिभाऊ जुबड, राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, बद्री चेडे, प्रकाश मार्कडे, नारायण मडके, सोमनाथ मडके, योगेश गर्जे, मयूर हुंडेकरी, अविनाश राजळे,सा. बा. चे उपअभियंता प्रल्हाद पाठक, निलेश साबळे, रामेश्वर राठोड, बाळासाहेब मुरदारे, संदीप भगत उपस्थित होते.