शेवगाव प्रतिनिधी, दि. २० : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड आणि गाजापुर गावात झालेला हल्ला आणि तोडफोड घटना निंदणीय आहेत. अशा समाजविघातक समाजकंटकावर कडक कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे व तहसीलदार प्रशांत सांगडे यांचेकडे शुक्रवारी देण्यात आले.
विशाल गडावरील अतिक्रमणचा मूळ विषय असताना समाजकंटकांनी गाजापुर या गावाला टार्गेट करत मुस्लिम समाजातील घराचे नुकसान करून तेथील नागरिकांना मारहाण व वाहनांचे नुकसान केले.या घटनेमुळे महाराष्ट्राला कलंक लागला आहे. या घटनेतील समाजकंटकावर आणि या घटनेचा मास्टरमाईंड शोधून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सकाल मुस्लिम समाज कॉ. ॲड सुभाष पाटील लांडे, समाजसेविका विद्याताई गाडेकर, कॉ. संजय नांगरे यांनी मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करीत पाठिंबा दिला.