कोपरगाव प्रतिनिधी, दि. २२ : तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात कोऱ्हाळकर कुटुंबियांचा नावलौकिक आहे. क्रीडा स्पर्धासह कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन, कामाची आवड असल्याने श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे गुगल अशी मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांची ओळख आहे. क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक व विविध खेळ संघटनावरील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास राज्यातून क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे पदाधिकाऱ्यांची असलेली उपस्थिती हीच त्यांच्या कामाची पावती आहे असे गौरवोद्गार उद्योजक व श्रीमान गोकुळचंद विद्यालयाचे अध्यक्ष कैलासचंद्र ठोळे यांनी काढले.
महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे जिल्हा सरचिटणीस व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांच्या सेवापुर्ती सोहळ्याप्रसंगी ठोळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे येथिल अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर होते.
व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, उद्योजक कैलास ठोळे, मनोज अग्रवाल, प्रसाद नाईक, काळे कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, माजी नगराध्यक्ष आर.डी.सोनवणे, विदयार्थी सहाय्यक समितीचे हीरालाल महानुभाव, जेष्ठ विधिज्ञ अॕड.जयंत जोशी, वनिता मंडळाच्या अध्यक्षा शैला लावर, सौ .सुनिता कोऱ्हाळकर, श्रीमती कुमुदिनी कोऱ्हाळकर, क्रीडा शिक्षक राजेंद्र कोहकडे, आनंद ठोळे, मुख्याध्यापक रमेश गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय ठोंबरे आदि उपस्थित होते.
गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यावेळी म्हणाल्या, एक विश्वासू जबाबदार मुख्याध्यापक व सहायक परीरक्षक म्हणून मकरंद कोऱ्हाळकर यांचे काम कायम स्मरणात राहिल. तालुका गणित विज्ञान प्रदर्शनात त्यांचा झोकून देऊन प्रशासनाला सहकार्य करून काम करण्याचा स्वभाव होता. त्यांच्या सेवानिवृत्ती मूळे एक पोकळी निर्माण होणार आहे. त्यांची सामाजिक बांधिलकी व सेवा न संपणारी असून सतत काम करण्यच्या भावनेमुळे निवृत्तीनंतर ही ते कार्यरत राहतील.
अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर म्हणाले, मकरंद कोऱ्हाळकर यांचे शारीरिक शिक्षण क्षेत्रातील काम मोठे आहे. राज्यस्तरीय अनेक शिक्षक, क्रीडा संघटनेत त्यांचे मोलाचे योगदान असल्यामुळे त्यांनी संघटनेचे तीन जिल्ह्याचे अध्यक्षपद त्यांच्या कार्य कर्तृत्वातून प्राप्त केले आहे.
मकरंद कोऱ्हाळकर म्हणाले, आयुष्यात समाजसाठी काही तरी केले पाहिजे या भावनेतून काम करत गेलो. त्यातून विद्यार्थी घडत गेले. तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात माजी मुख्याध्यापक कै.आर. जी. कोऱ्हाळकर यांचा एक पॅटर्न आहे तोच राबविण्याचा प्रयत्न मी पण केला. मी जे काम करु शकलो ते श्रीमान गोकुळचंदजी विदयालयामुळे करु शकलो, सेवेतून जरी निवृत्त झालो तरी सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील काम यापुढे पूर्णवेळ चालूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
नासिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डाॕ. सुधीर तांबे व मान्यवरांच्या हस्ते मुख्याध्यापक कोऱ्हाळकर यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर,विविध संघटनांचे पदाधिकारी, कोपरगाव ब्राम्हण सभेचे कार्यकारिणी सदस्य पदाधिकारी, मित्र, मंडळी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीपकुमार अजमेरे,स्था निक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे, डाॕ.अमोल अजमेरे, आनंद ठोळे, राजेश ठोळे यांनी मकरंद को-हाळकरसरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद क्षीरसागर यांनी केले.
सूत्रसंचालन क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ.अहमदनगर चे अध्यक्ष अरुण चंद्रे यांनी केले.आभार सोहम कोऱ्हाळकर यांनी मानले